weekly horoscope 5th march 2023 to 11th march 2023
weekly horoscope 5th march 2023 to 11th march 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (५ मार्च २०२३ ते ११ मार्च २०२३)

श्रीराम भट saptrang@esakal.com

व्यवसायात वसुली होईल

मेष : पौर्णिमेचं एक झकास फिल्ड राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा गाठीभेटींसाठी उत्तम. विवाहविषयकसुद्धा गाठीभेटी घ्या. व्यावसायिक वसुली होईल. ता. ९ व १० हे दिवस भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांच्या पाठबळातून वैयक्तिक उत्सव - समारंभातून प्रसन्न ठेवतील. पुत्रोत्कर्षातून धन्यता.

सुवार्ता आणि प्रसिद्धी लाभेल

वृषभ : सप्ताहात उत्तम चंद्रबळ राहील. शुभग्रहांच्या स्पंदनातून वसंत फुलेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचा लाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ ते ११ हे दिवस सुवार्तांनी भरपूर आनंद देतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धीचा योग. गुंतवणुकीतून लाभ होईल, देवदर्शनाचा योग.

मुलाखती यशस्वी होतील

मिथुन : पौर्णिमेची स्पंदनं प्रभावी राहतील. नोकरी-व्यावसायिक क्षेत्रात भाग्योदय दृष्टिपथात येईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पूर्णपणे बॅटिंग फिल्ड असेल. सभा-संमेलनं गाजवाल. प्रेमिकांचं छान ‘रंग बरसे’ होईल. आर्द्रा नक्षत्रास नोकरीसाठीच्या मुलाखतींमध्ये यश. काहींना परदेशगमनाची संधी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची कलात्मक वाटचाल होईल.

परदेशगमनाचा योग

कर्क : पौर्णिमेजवळ शुभग्रह भाग्यबीजं पेरतील, थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील. ता. ९ व ११ हे दिवस घरात मोठ्या आनंदोत्सवाचे. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय फॉर्ममध्ये येतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा व्यावसायिक लॉटरीची, गुरुवारी गुरुकृपा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचं परदेशगमन होईल.

नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील

सिंह : मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात पौर्णिमेचं फिल्ड महत्त्वाच्या गाठीभेटी फलदायी होणारं. घरात प्रिय व्यक्तींचे भाग्योदय. ता. ९ ते ११ हे दिवस पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीमधून लाभ देणारे. शुक्रवारचा दिवस तरुणांना मोठ्या विजयोत्सवाचा. प्रेमिकांच्या गुजगोष्टी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील.

मोठ्या संधी मिळतील

कन्या : पौर्णिमेनंतर यंदाचा वसंतोत्सव वैभवसंपन्नतेकडे नेणारा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ ते ११ हे दिवस जीवनाची मोठी क्षितिजं दाखवतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उत्तम प्रवासयोग, विशिष्ट देवदर्शनं होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना पूर्णपणे बॅटिंग फिल्ड राहील. महत्त्वाची कामं करून घ्या.

राजकीय लाभ होतील

तूळ : चंद्रबळातून मोठे लाभ घ्याल. ता. ९ ते ११ हे दिवस स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहयोगांच्या स्पंदनातून, जनसंपर्कातून प्रभाव टाकतील. सतत आगतस्वागत होईल, प्रेमिकांचा विरह संपेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा कलात्मक आविष्कार पाहायला मिळेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार राजकीय लाभाचा.

सुवर्णक्षणांची नोंद होईल

वृश्‍चिक : सप्ताहात चंद्रकलांचा अमृतवर्षावच होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती अधिकारसंपन्न होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा हरवलेलं मिळवून देणारी. वैवाहिक जीवनात सुसंवाद घडेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ८ ते १० हे दिवस मोठ्या पर्वणीसारखेच. जीवनातील सुवर्णक्षण नोंदवले जातील. विवाहयोगाची शक्यता.

वसंतोत्सव साजरा कराल

धनू : सप्ताहातील चंद्रकलांचा प्रवास चांदणे शिंपीत जाणाराच. गुरूवर श्रद्धा ठेवाच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना साक्षात्कार होईल. जीवनातली शल्यं निघून जातील, आत्मविश्‍वास वाढेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ ते ११ हे दिवस विजयी चौकार - षटकारांचेच. सप्ताहात उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती घरी व दारी दिलखुलास वसंतोत्सव साजरा करतील.

प्रसन्नता अनुभवाल

मकर : सप्ताहात चंद्रबळातून विशिष्ट लाभ होतीलच, शिवाय शुभग्रहांचं पॅकेजही बरोबर आहेच. सप्ताह सज्जनांना आणि गुरुभक्तांना उत्तमच प्रचिती देणारा. श्रवण नक्षत्रास ता. ९ ते ११ हे दिवस अतिशय प्रसन्न ठेवतील. शैक्षणिक यश, नोकरीचा लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून रंगबरसे. छान सहली, करमणूक होईल.

शुभ ग्रहांची रसद मिळेल

कुंभ : पौर्णिमेचा सप्ताह आपल्या राशीवर पूर्ण अंमल करेल. अर्थात शुभ ग्रहांचा अंडरकरंट चंद्रबळाचा वापर करून घेईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील प्रत्येक संध्याकाळ रम्य राहील, प्रेमिकांनो घ्या लाभ. शिवाय, सप्ताहात व्यावसायिकांना शुभ ग्रहांकडून उत्तम रसद पुरवली जाईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना तुकाराम बिजेचा गुरुवार मोठा भाग्यलक्षणी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रसंगतीतून लाभ.

प्रिय व्यक्तींच्या सहवासाचा आनंद

मीन : राशीतील गुरू-शुक्र पौर्णिमेचं वैभव उपभोग देणार आहेत. सप्ताहातील प्रत्येक सूर्योदय विलक्षण नवा असेल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनसत्त्वांचा मोठा पुरवठा. तारुण्य बहरेल. प्रिय व्यक्तींबरोबर मौजमजा कराल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ व ११ हे दिवस दैवी प्रचितीतून कायम लक्षात राहतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्वप्नदृष्टांत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT