दैवी प्रचितीचा अनुभव येईल
मेष : सप्ताह अनेकांची विजयी घोडदौड करणारा. सप्ताहातील चंद्रबळातून भाग्यातील मंगळ-शुक्र जोडगोळी मोठी अफलातून बोलेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ. वास्तुविषयक खरेदी-विक्री. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय व्यक्तींकडून लाभ. शनिवारची एकादशी दैवी प्रचितीची.
गॉडफादर लाभेल
वृषभ : ढगाळलेलं वातावरण जाईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. रेंगाळलेलं विवाहप्रकरण मार्गी लागेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ९ तारखेची अष्टमी मोठी भाग्यबीजे पेरणारी. व्यावसायिक वसुलीचे संकेत. बॅंकेची कर्जमंजुरी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारची जया एकादशी विजयोत्सवाची !
छान स्वभावाची माणसं भेटतील
मिथुन : सप्ताहातील चंद्रबळ मंगळ-शुक्राच्या साथीतून मोठा ऊर्जास्रोत देईल. सतत छान स्वभावाची माणसं भेटतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची सतत चलती राहील. पती वा पत्नीला सतत खूष ठेवाल. और क् या! सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहांच्या पूर्णतः लॉबीचा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे सत्कार. पुत्रोत्कर्ष होईल.
थक्क करणाऱ्या सुवार्ता
कर्क : सप्ताहात घरातील प्रिय व्यक्तींच्या चिंता जातील. कार्ये ठरतील. वास्तुविषयक चिंता जाईल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची रथसप्तमी धक्कादायक सुवार्तांतून थक्क करेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह दैवी प्रचितीचा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी गावगुंड जपावे. मध्यस्थी नको.
विवाहयोग बलवत्तर
सिंह : राशींच्या एक्स्चेंजमध्ये सप्ताहात जनसंपर्कातून प्रभाव टाकणारी रास राहील. सप्ताहात चंद्रबळातून सुवार्तांचाच भर राहील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बलवत्तर विवाहयोग. घरात भावाबहिणींचे भाग्योदय. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणातून लाभ. वादग्रस्त येणी येतील. रथसप्तमी विजयोत्सवाची.
म्हणाल ते होण्याचा कालखंड
कन्या : रथसप्तमीचा सप्ताह निश्चितच ऊर्जा देणारा. घरात अतिशय सुंदर आणि सुगंधित असे मानसिक पर्यावरण राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती अष्टमीच्या प्रभावात छान फुलतील. नव्या ओळखींतून लाभ. ता. १० ते १२ हे दिवस उमलत्या कळ्यांचे. म्हणाल ते होईल! चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती सेलिब्रेटी होतील.
न्यायालयीन कामकाजात यश
तूळ : सप्ताह चंद्रकलांच्या उत्तम वाटचालीचा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा उत्तम बहर अनुभवतील. उद्याची रथसप्तमी कलाकारांना छानच. विवाहेच्छूंनी प्रेमाची जाळी अवश्य टाकावीत. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारची जया एकादशी मोठ्या भाग्यसंकेताची. पुत्रचिंता कायमची जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टात जय!
ग्रहस्पंदनं संधी लाभ उठवून देतील
वृश्चिक : चंद्रबळ आणि शुभ ग्रहांचे अंडरकरंट हेच सप्ताहाचे फलित राहील. रोखून धरलेले श्वास मोकळे होतील. ता. ९ व १० जवळचे अष्टमीचे ग्रहस्पंदन संधींचा लाभ उठवून देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितीचा छान लाभ उठवतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना कर्जवसुलीतून लाभ.
राजकीय व्यक्तींकडून लाभ
धनु : राशीतील लव्हबर्ड्स अर्थातच मंगळ-शुक्र उद्याच्या रथसप्तमीच्या ऊर्जेचा उत्तम लाभ घेतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना छान फ्लॅशन्यूज देतील. परदेशस्थ व्यक्तींचे भाग्योदय. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय व्यक्तींकडून लाभ. सरकारी कामे. वादग्रस्त भूखंड सोडवाल. शेअर बाजारातून प्राप्ती.
नोकरीत कौतुक होईल
मकर : सप्ताहात चंद्रबळातून जीवनसत्त्वांचा पुरवठा होईल. सप्ताह व्यावसायिकांना ऊर्जा देणारा. एखाद्या नुकसानीचे भय संपेल. उत्तराषाढा व्यक्तींना मित्रांकडून लाभ. श्रवण नक्षत्रास ता. ८ ते १० हे दिवस महत्त्वाच्या कामांतून गतिमान राहतील. ओळखींतून विवाहप्रस्ताव येतील. नोकरीत कौतुक होईल.
तरुणांना ऊर्जा मिळेल
कुंभ : ग्रहांची स्पंदनं चंद्रबळ खेचून घेईल. उद्याची रथसप्तमी उमलत्या तरुणांना ऊर्जा देईल. शततारका व्यक्ती सतत सुवार्तांतून फ्लॅशन्यूज देतील. ता. ८ ते १० हे अष्टमीचे प्रभावक्षेत्र निश्चितच चौकार-षट्कारांचे राहील. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींना संमोहनशक्ती प्राप्त होईल. अर्थातच सर्वत्र लक्ष वेधून घ्याल.
आर्थिक स्रोत प्रवाही असेल
मीन : सप्ताह व्यावसायिक आर्थिक स्रोत मोठा प्रवाही करेल. विशिष्ट उत्सव-प्रदर्शने यशस्वी होतील. ता. ८च्या अष्टमीजवळ चंद्रबळ सर्वोत्तम राहून ते शनिवारी जया एकादशीची पर्वणी साधेल. एकूणच सप्ताह नक्षत्रलोकांतून लाभ देईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती श्रीमंतांच्या यादीत जातील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचे सतत आगतस्वागत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.