weekly horoscope 3rd march 2024 to 9th march 2024 sakal
Weekly Horoscope | साप्ताहिक राशी भविष्य

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : (०३ मार्च २०२४ ते ०९ मार्च २०२४ )

सप्ताह ग्रहयोगांतून उच्च दाबाचाच. सर्व बाबतीत सावधानता बाळगावी. नोकरीत क्रिया-प्रतिक्रियांतून सावध, सप्ताहांचा आरंभ आणि शेवट जपण्याचा.

सकाळ वृत्तसेवा

सर्वत्र सावधानता बाळगावी

मेष : सप्ताह ग्रहयोगांतून उच्च दाबाचाच. सर्व बाबतीत सावधानता बाळगावी. नोकरीत क्रिया-प्रतिक्रियांतून सावध, सप्ताहांचा आरंभ आणि शेवट जपण्याचा. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ आणि ६ हे दिवस घरात आनंदोत्सवाचे, पुत्रपौत्रांचे भाग्योदय. ता. ८ चा शुक्रवार अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून मोठा प्रसन्न राहील.

उत्तम नोकरी मिळेल

वृषभ : सप्ताहाची सुरुवात तरुणांना शैक्षणिक संदर्भातील प्रश्न सोडवणारी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी मिळेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील नव्या परिस्थितीतून लाभच घडतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह वैवाहिक जीवनातून कलहजन्य ठरू शकतो. नवपरिणितांनी सांभाळावं. सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस विचित्र परिस्थितीतून छायाग्रस्त करणारा.

व्यावसायिकांना तेजीचा काळ

मिथुन : सप्ताहातील मंगळाचं भ्रमण पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दखलपात्र राहील, दुखापतीपासून सांभाळा. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकाना तेजीचाच राहील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून फलदायी होणारा. मात्र सप्ताहात द्वाड मित्रांशी संगत नको. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ८ हे दिवस वैयक्तिक उत्सव-समारंभ यशस्वी करतील.

वरिष्ठांशी वादविवाद टाळा

कर्क : सप्ताहात मोठं संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान राहील. तरुणांना कला, छंद वा उपक्रमांतून लाभ वा प्रसिद्धी मिळेल. पती वा पत्नीच्या संदर्भातील मोठ्या सुवार्ता धक्का देतील. बाकी आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत वरिष्ठांशी वाद वा गैरसमज टाळावेत. बाकी सप्ताह व्यावसायिक लॉटरीचा. पुष्य नत्रत्रास सप्ताह वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ देईल. व्यावसायिक वसुली.

संयम राखा, काळजी घ्या

सिंह : सप्ताहातील मंगलभ्रमण ग्रहयोगांतून उच्चदाबाचं राहील. शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर संयम राखा. वाहतुकीत सांभाळा. बाकी सप्ताहात ता. ५ व ६ हे दिवस गुरुप्रचिती देणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक परिस्थितींतून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार प्रसन्न गाठीभेटींचा. प्रेमिकांचेही सुसंवाद घडतील.

वादग्रस्त येणे वसूल होईल

कन्या : सप्ताहात विचित्र गाठीभेटींतून वा प्रसंगांतून बेरंग करू शकतो. संयम पाळा. बाकी सप्ताह घरगुती पार्श्वभूमीवर उत्तमच राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना क्रिया-प्रतिक्रियांतून मंगळाच्या उच्च दाबातून स्फोटक ठरू शकतो. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना एखादी गुप्त स्थिती बुधवारच्या एकादशीच्या दिवशी निघून जाईल. वादग्रस्त येणे येईल.

बुद्धिजीवी मंडळींना लाभ

तुळ : बुद्धिजीवी मंडळींना सप्ताह विलक्षण अशी फळं देईल. शुक्रभ्रमण अपवादात्मक परिस्थितींतून लाभ देईल. विशाखा नक्षत्राच्या तरुणांना प्रेम प्रकरणांतून उत्तम मार्गस्थ करणारा सप्ताह. नोकरीत बदलीतून भाग्योदय ता. ५ ते ६ हे दिवस चमत्कार घडवतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना थोरा-मोठ्यांकडून लाभ, मात्र शनिवारी भांडणं टाळा. स्त्री वर्गाशी जपून.

वादग्रस्त पार्श्‍वभूमीचा त्रास

वृश्चिक : सप्ताहातील मंगळभ्रमण ग्रहयोगांतून वादग्रस्त पार्श्वभूमीवर ज्वालाग्राही ठरू शकते. संयम ठेवा. बाकी सप्ताह विशिष्ट नव्या व्यावसायिक पर्यायातून लाभ देणारा. ता. ५ ते ७ हे दिवस करारमदार, गाठीभेटींतून सुसंगत राहतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीकडून लाभ. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरात माध्यमातून लाभ. मात्र शनिवारी भाजणं, कापणं जपा.

खरेदी-विक्रीत फसगत शक्य

धनु : सप्ताहात विचित्र खर्चाचे प्रसंग येऊ शकतात. खरेदी-विक्रीत फसगतीचे प्रसंग येतील. प्रेमिकांनी सप्ताहात आचारसंहिता पाळावी. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना विशिष्ट झगमगाटी फळं देईल. पूर्वाषाढा नक्षत्रास ता. ६ मार्चची विजया एकादशी विजयोत्सवाची. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मानसन्मानाचा. व्यावसायिक वसुली होईल.

मित्रांशी वाद टाळा

मकर : सप्ताहात वाहनांपासून सांभाळा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह सरकारी माध्यमांतून लाभ देणारा. तरुणांना ओळखी-मध्यस्थीतून लाभ देणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह विशिष्ट घरगुती वादातून त्रास देऊ शकतो. बाकी सप्ताह नोकरीत पगारवाढीतून बोलेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी व्यावसायिक वसुली. शनिवारी तरुणांनी मित्रांशी हुज्जती टाळाव्यात. स्त्रीशी मस्करी नको.

आर्थिक संकट जाईल

कुंभ : सप्ताहात मानसिक पर्यावरण वा मानसिक आरोग्य जपलंच पाहिजे. नवपरिणितांनी सप्ताहात सांभाळावंच. बाकी सप्ताहात गुरुभ्रमणाचा आंतरप्रवाह राहीलच. ता. ५ व ६ हे दिवस करारमदार वा गाठीभेटींतून अतिशय सुसंगत राहतील. शततारका नक्षत्रास दैवी प्रचिती येईल. आर्थिक संकट जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास शनिवार प्रवासात बेरंगाचा.

पगारात चांगली वाढ होईल

मीन : तरुणांना सप्ताह अतिशय मजेदार फळं देईल. नोकरीत प्रशंसा होईल. कलाकारांचे मोठे भाग्योदय. एकूणच ता. ५ ते ७ हे दिवस तरुणांना शिक्षण, नोकरी व विवाह या त्रिघटकांतून मोठे शुभसूचक ठरतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील पगारवाढ थक्क करेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची पती वा पत्नीविषयक चिंता जाईल. मात्र शनिवारी रोख पैसे सांभाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT