gandhi movie gandhi movie
महात्मा गांधीजींच्या जीवनावर १९८२ मध्ये गांधी चित्रपट बनविण्यात आला होता. या चित्रपटाने अकादमीतील सर्वश्रेष्ठ पुरस्कारासोबत ८ अन्य पुरस्कार जिंकले होते. रिचर्ड अॅटनबरो यांनी गांधी चित्रपट दिग्दर्शित केला होता. यामध्ये बेन किंग्सले यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तूरबा यांची भूमिका साकरली होती. रोहन सेठ यांनी स्वतंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची भूमिका साकारली होती.सईद जाफरी, ओम पुरी, अमरीश पुरी, नीना गुप्ता यांच्यासह इतर कलाकारांनीही देखील गांधी चित्रपटात काम केले होते.या चित्रपटाला आठ पुरस्कार मिळाले होते. चित्रपटाची वेशभूषाकार भानू अथैय्या या पहिला ऑस्कर अवार्ड जिंकणाऱ्या भारतीय होत्या. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.