Noel Tata Reportedly Opposes Reappointment
esakal
मुंबई : देशातील आघाडीच्या टाटा समूहाच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांची पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, चंद्रशेखरन यांनी ऑगस्टमध्ये विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर पद सोडण्याची घोषणा केली होती. मात्र, संचालक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांचा निर्णय बदलण्यात आला.