धनंजय माने इथेच राहतात का???? तुम्ही दिलेले 70 रुपये पण वारले...., हा शुद्ध हलकटपणा आहे माने ...हे डॉयलॉग ऐकल्यावर आजही आपण खळखळून हसतो. प्रेक्षकांना आपल्या विनोदी शैलीने हसविणारा मराठी चित्रपटाला आज 33 वर्ष पूर्ण होत आहे.
२३ सप्टेंबर १९८८ रोजी म्हणजे आजच्या दिवशी 33 वर्षांपूर्वी सर्वांचा आवडता 'अशी ही बनवा बनवी" चित्रपट प्रदर्शित झाला. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू कायम आहे. आजही या चित्रपटाचा चाहता वर्ग आहे. सर्वांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. जुने मित्र, नोकरीच्या शोधात फिरणारे तरुण, खडूस घरमालक, घरासाठी केलंल अफलातून जुगाड त्यानंतर सुरू झालेली मज्जा अशा धम्माल कथेवर आधारित हा चित्रपट आजही प्रेक्षकांना जवळचा वाटतो.अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सिध्दार्थ, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, विजू खोटे अशी एकापेक्षा एक कलाकार या चित्रपटात काम केले आहे आहे. या चित्रपटातील संवाद आजही लोकांना तोंडपाठ आहेत. कित्येकदा त्याचे सोशल मिडियावर मिम्स देखील व्हायरल होत असतात. या चित्रपटातील काही आवडते डायलॉग आपण जाणून घेऊ या'....''धनंजय माने इथेच राहतात का ?''
''तुम्ही दिलेले 70 रुपये पण वारले''''हा माझा बायको पार्वती''''लिंबू कलरची साडी''''आमच्या शेजारी राहते नवऱ्याने टाकलंय तिला''''आता फक्त माधुरी म्हणायचं....''''जाऊबाई – नका बाई जाऊ एवढ्यात''''निरंजन बाबाचा आंबा'' ''हा शुद्ध हलकटपणा आहे माने'' ''सारखं सारखं एकाच झाडावर काय?''
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.