Entertainment: TV Actors who left show and came back  esakal
फोटोग्राफी

Entertainment: अर्ध्यातून सोडला या टीव्ही कलाकारांनी शो पण डिमांड अशी की चाहत्यांनी...

या टीव्ही कलाकारांचं प्रेक्षकांच्या मागणीने कम बॅक झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

सर्वांनाच रोमांचक आणि मनोरंजक टीव्ही शोज आवडतात. मात्र कॅमेराच्या मागे बरेच काही चालले असते ज्याची प्रेक्षकांना कल्पनाही नसते. निधी शाह, मयुरी देशमुख आणि अशा अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी शो सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करत अखेर शो सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र शोच्या माध्यमातून या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकल्याने या कलाकारांना शोमध्ये परत बोलावण्याची मागणी होऊ लागली.

मयुरी देशमुख या अभिनेत्रीने मालिनीच्या भूमिकेत 'इमली' या फेमस टीव्हीमध्ये शोमध्ये काम केले होते. काही महिन्यांपूर्वी तिने शोमधील तिचा प्रवास संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रेक्षकांची वाढती मागणी आणि तिची शोमधील गरज लक्षात घेता शोमध्ये नवा ट्विस्ट टाकण्यात आला. परत एकदा या अभिनेत्रीच्या पूनरागमनाने या शोला नवं वळण आलंय.
निधी शाह - 'अनुपमा' या फेमस मालिकेतील किंजलच्या भूमिकेतून निधी शाहने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. मात्र मालिकेतील तिचा संघर्ष मोठा होता. तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिची वाढती फॅन फॉलोविंग बघता तिने हा निर्णय बाजूला सारत तिची किंजल म्हणून भूमिका पुढे कंटीन्यू केली.
शिवांगी जोशी - 'ये रिश्ता क्या केहलाता है' या फेमस मालिकेतून शिवांगीने निरोप घेतला तेव्हा प्रेक्षकांना धक्काच बसला होता. तिने मालिका सोडताच मालिकेतील नायराचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तिच्या जाण्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. तिने शोमध्ये परत येण्याच्या प्रेक्षकांच्या मागणीनंतर या कॅरेक्टरच्या रूपात शिवांगीचं कमबॅक झालं.
रूबिना दीलैक - 'शक्ति अस्तित्व के एहसास की' मधील सौम्या या भूमिकेसाठी बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दीलैक प्रिय होती. मात्र निर्मात्यांशी झालेल्या मतभेदानंतर अभिनेत्रीने मध्यंतरी हा शो सोडला. काही काळानंतर तिने या शोमध्ये कमबॅक करत हा शो आधीपेक्षा अधिक मनोरंजक केला होता.
सुशांतसिंग राजपुत - 'पवित्र' रिश्ता या लोकप्रिय मालिकेत मानव म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या सुशांतने मालिका मधातूनच सोडली होती. मात्र शेवटच्या एपिसोडमध्ये परत येत त्याने चाहत्यांना खुश केले आहे.
मनीत जौरा - मनीतने 'कुंडली भाग्य' या मालिकेत रिषभच्या भूमिकेत काम केले होते. या अभिनेत्याने 'नागिन ६' या शोसाठी ही मालिका सोडली. मात्र मेकर्सने या शोमध्ये त्याला परत आणण्याचं ठरवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT