मुंबई - भारतीय क्रिकेटसंघाचा सलामीवीर शिखर धवन सध्या तुफान चर्चेत आहे. याचे कारण त्याचा झालेला घटस्फोट. सोशल मीडियावर कालपासून त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झालीय. त्याची पत्नी आयशानं इंस्टावर यासंबंधी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता आपण अशा क्रिकेटपटूंशी नावं जाणून घेणार आहोत ज्यांनी महिला खेळांडूंशी संसार थाटला होता. या यादीमध्ये काही वेळेपूर्वी शिखर धवनचंही नाव होतं. मात्र आता त्याचा घटस्फोट झाला आहे. त्या घटनेच्या निमित्तानंच आपण त्या क्रिकेटपटूंविषयी जाणून घेणार आहोत.
रॉबिन उथप्पा आणि शितल गौतम भारताचा स्टार खेळाडू म्हणून रॉबिनकडे पाहिलं जातं. 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपपासून शितल आणि रॉबिनची ओळख झाली होती. ती एक टेनिसपटू होती. 2016 मध्ये ते दोघे विवाहबध्द झाले
मिचेल स्टार्क आणि अलयासा हेली मिचेल आणि त्याची पत्नी अलयासा हे दोघेही क्रिकेटर आहेत. अलयासाच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तिनं टी 20 मध्ये विकेट किपर म्हणून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. केदार जाधव आणि स्नेहल प्रमोद भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवची पत्नी ही देखील एक क्रिकेटर आहे. ती यष्टीरक्षक आहे. महाराष्ट्र आणि वेस्टर्न झोन क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व तिनं केलं आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या लिस्टमध्ये शोएब हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्यानं वेगळ्या देशातील मुलीशी लग्न केलं. पाकिस्तानचा अष्टपैलु खेळाडू म्हणून शोएब अख्तरची ओळख आहे. त्यानं भारताच्या स्टार टेनिस खेळा़डूशी लग्न केलं होतं. तिचं सानिया मिर्झा. सानियानं आतापर्यत सहा ग्रँड स्लॅम मिळवले आहेत. ईशांत शर्मा आणि प्रतिमा सिंग भारतीय वेगवान गोलंदाज ईशांत शर्माची पत्नी ही बास्केटबॉल खेळाडू आहे. त्या खेळामध्ये तिनं विशेष प्राविण्य मिळवलं आहे. दिल्ली विद्यापीठाकडून खेळताना तिनं हे यश मिळवलं आहे. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी जसं की आपल्या सर्वांना माहिती झालं असेलच, या दोघांचा आता घटस्फोट झाला आहे. त्यांच्या य़ा घटस्फोटामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. 2009 मध्ये त्यांची फेसबूकवरुन ओळख झाली होती. डेव्हिड वॉर्नर आणि कँडिस वॉर्नर कँडिशसोबत वेगवेगळ्या पोस्ट डेव्हिड वॉर्नर शेयर करत असल्याचे दिसून आले आहे. त्यानं यापूर्वी सोशल मीडियावर पत्नीसोबत डान्स करत असल्याचे व्हिडिओ शेयर केले होते. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दिनेश कार्तीक आणि दीपिका पल्लीकल दिनेश कार्तिकच्या लग्नाबाबत एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. निकिता वंजारासोबत तिनं लग्न केलं होतं. मात्र काही काळानं ते लग्न टिकलं नाही. त्यानं पुढे खेळाडू दीपिका पल्लीकल सोबत 2015 मध्ये लग्न केलं. पल्लीकल ही एक व्यावसायिक स्क्वॉश खेळाडू आहे. ईशांत शर्मा आणि प्रतिमा सिंग
भारतीय वेगवान गोलंदाज ईशांत शर्माची पत्नी ही बास्केटबॉल खेळाडू आहे. त्या खेळामध्ये तिनं विशेष प्राविण्य मिळवलं आहे. दिल्ली विद्यापीठाकडून खेळताना तिनं हे यश मिळवलं आहे.मिचेल स्टार्क आणि अलयासा हेली
मिचेल आणि त्याची पत्नी अलयासा हे दोघेही क्रिकेटर आहेत. अलयासाच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तिनं टी 20 मध्ये विकेट किपर म्हणून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.