Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

Ladki Bahin Yojana : राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते. रक्षाबंधनाच्या काळात जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता.
Ladki Bahin Yojana Payment Status

Ladki Bahin Yojana Payment Status

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Payment Status: What Beneficiaries Should Know : लाडक्या गणरायाचे राज्यभर जल्लोषात स्वागत झाले असून, गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्यातच राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पात्र महिलांच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून हप्ता वितरणाची प्रक्रिया १६ किंवा १७ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com