actor aroh welankar comment on mahavikas aghadi  sakal
फोटोग्राफी

Photo : महाविकास आघाडीवर सडकून टीका करणारा अभिनेता आरोह वेलणकर आहे तरी कोण?

आपल्या भूमिकेतून महाविकास आघाडीला धारेवर धरणाऱ्या आरोह वेलणकर विषयी थोडक्यात..

नीलेश अडसूळ

Aroh velankar : अभिनेता आरोह वेलणकर हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. शिवाय राजकीय विश्वावरही तो भाष्य करताना दिसतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तो बराच सक्रिय असतो. त्याचा पाठिंबा उघडपणे भाजप पक्षाला असल्याचे वारंवार दिसले आहे. तो केंद्र सरकारच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करत असतो. त्यात गेली दोन दिवस महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर त्याने भाष्य केले आहे. काल त्याने ट्विट करत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. आता थेट त्याने महाविकास आघाडी सरकारचे दिवस भरले,असे ट्विट करत निशाणा साधला. सध्या त्याचे ट्विट व्हायरल होत आहेत. त्यामुळे जाणून घेऊया आरोह विषयी थोडक्यात माहिती... (actor aroh welankar comment on mahavikas aghadi) (aroh welankar profile story)

अभिनेता आरोह वेलणकर हा कायमच महाविकास आघाडी मधील न पटणाऱ्या गोष्टींवर टीका करत आला आहे. परंतु आज त्याचे ट्विट लक्षवेधी ठरले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचा सुरत दौरा असो किंवा ५० आमदारांचा पाठिंबा यावर त्याने खोचक टीका केली.
आरोह महाविकास आघाडीच्या विरोधात बोलतो म्हणून त्याला अनेकदा ट्रॉल केले गेले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून त्याला त्रासही झालेला आहे.
पण आरोह हा केवळ राजकीय भाष्य करत नाही तर त्याचे सामाजिक कामातील योगदानही मोठे आहे. महाराष्ट्रात आलेले पूर असो, किंवा कोविडचा कठीण काळ यामध्ये आरोहने दिवस रात्र एक करून लोकांची मदत केली आहे.
आरोह पुण्यात राहत असून अभिनय क्षेत्रातही त्याने चांगले नाव कमावले आहे. प्रायोगिक रंगभूमी, रेगे सारखा दर्जेदार चित्रपट, झी मराठी वरील 'लाडाची मी लेक गं' मालिका आणि मराठी 'बिग बॉस' अशी दर्जेदार कामगिरी त्याने केली आहे.
आरोह अभिनेता असला तरी त्याने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. नुकताच त्याचा 'फनरल' चित्रपट रिलीज झाला असून आरोह च्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली आहे. आरोह हा आपल्या भूमिका तटस्थ पणे मांडणार एक निर्भीड अभिनेता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

Love Affair Tragic End : प्रेमाचा धक्कादायक शेवट! अल्पवयीन मुलीसह तरुणाने राधानगरी जंगलात जीवन संपवलं, एकाच झाडाला गळफास; दोन दिवसांनी मृतदेह हाती

तिला लाजच नाही... 'आई माझी काळूबाई'च्या सेटवर अलका कुबल- प्राजक्तामध्ये झालेला मोठा वाद; नेमकं काय घडलेलं?

Road Accident : अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह चार भाविकांचा दुर्दैवी अंत, सात जण जखमी

SCROLL FOR NEXT