See the Father's Day post of these celibrities  esakal
फोटोग्राफी

Father's Day 2022: माधुरीपासून ते सोनालीपर्यंत..बाबांचं कौतुक सर्वांसाठीच मोलाचं

माधुरी दिक्षित,सोनाली बेंद्रे यांसारख्या बड्या कलाकारांनी आज 'फादर्स डे' ची खास पोस्ट टाकली आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

बाबांचं महत्व खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाचं असतं.पण 'फादर्स डे' च्या निमित्तानं याच वडिलांविषयी काही तरी खास बोलण्याची संधी सगळ्यांना सापडते.आजच्या दिवशी अनेक सेलिब्रिटीज वडिलांचं कौतुक करत,पोस्ट टाकत व्यक्त झाले आहेत.माधुरी दिक्षित,सोनाली बेंद्रे यांसारख्या बड्या कलाकारांनी आज 'फादर्स डे' ची खास पोस्ट टाकली आहे.

माधुरी दिक्षितचे पती श्रीराम नेने यांच्याविषयी बोलताना माधुरीने ही खास पोस्ट टाकली आहे.'वडिल म्हणजे मुलांना संरक्षण देणारी ढाल आहे.वडिल त्यांच्या मुलांचं रक्षण करण्यासाठी काहीही करू शकतात.आणि आपल्या मुलांना जीवनाचे अशे धडे शिकवतात जे कोणीही शिकवू शकत नाही.'असे कॅप्शन देत माधुरीने नवरा आणि मुलासह एक फॅमिली फोटो टाकत ही खास पोस्ट लिहीली आहे.
माधुरीने या पोस्टमधे आणखी एक फोटो टाकलाय.या फोटो मधे माधुरीचे पती श्रीराम नेने बाळाला हातात धरून दिसताय.बाळावर असणारं निखळ प्रेम त्यांच्या स्माईलमधून तुम्हाला दिसतच असेल.हा फोटो तिचे पती श्रीराम आणि तिच्या पहिल्या मुलाचा आहे.
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील तिच्या बाबांसोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकलाय.हॅप्पी फादर्स डे बाबा म्हणत तीने ही पोस्ट शेअर केली आहे.
सोनालीने कॅप्शनमधे काही खास लिहीलं नसलं तरी बापलेकांचा तिने टाकलेला हा फोटो अत्यंत बोलका आहे.बापलेकांचं एकमेकांवर असणारं प्रेम या फोटोमधून झळकतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT