मनोरंजन क्षेत्रात आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना प्रभावित करणारी अभिनेत्री म्हणजे निया शर्मा आहे. तिनं कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे तिच्या वेगवेगळ्या फोटोंमुळे. सोशल मीडियावर तिनं यापूर्वी फोटो आणि व्हि़डिओ शेयर केले आहेत. आज नियाचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण तिच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देणार आहोत. सध्या आशियातील सर्वात सेक्सी वुमन म्हणून नियाची ओळख आहे.
काली एक अग्निपरिक्षा नावाच्या मालिकेपासून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. बोल्ड आणि हॉटनेससाठी नियानं आतापर्यत लाखो चाहत्यांची पसंती मिळवली आहे. सुरुवातीला एखाद्या भोळ्या अभिनेत्रीच्या लूकमध्ये असणारी निया आता सर्वात बोल्ड आणि सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नियानं आतापर्यत वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये भाग घेतल्याचे दिसून आले आहे. ती खतरो के खिलाडी कार्यक्रमाची विजेती देखील होती. सोशल मीडियावर आपल्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. आज निया आपला 31 वा वाढदिवस साजरा करते आहे. त्यानिमित्तानं तिला तिच्या लाखो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीमध्ये नियाचा जन्म झाला. तिचं शिक्षणही दिल्लीमध्ये झालं. मीडिया अभ्यासक्रमाची पदवी तिनं घेतली. त्यात तिला करिअर करायचं होतं. आपल्याला पत्रकार व्हायचं हे तिनं ठरवलं होतं. 2010 मध्ये तिनं आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. काली एक अग्निपरिक्षातून तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. छोट्या पडद्यावर काम करण्याच्या तिला अनेक ऑफर मिळाल्या होत्या. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.