Sushmita Sen New Car
Sushmita Sen New Car esakal
फोटोग्राफी

Sushmita Sen च्या नव्या कारची खास बात, बटन दाबताच ती रॉकेट बनते! वाचा खासियत

सकाळ ऑनलाईन टीम

माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकतीच Mercedes-AMG GLE 53 coupe कार खरेदी केली. तिच्या या नव्या कारची सोशल मीडियावर भन्नाट चर्चा चालली. या कारचे फिचर्ससुद्धा भन्नाट आहेत. कळताच तुम्हीही अवाक व्हाल.

Mercedes-AMG GLE 53 4MATIC+ coupe SUV कारचं लूक फार क्लासी आणि लक्झरी असून तिचा आतील परफॉर्मंससुद्धा फार चांगला आहे. भारतात या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.63 कोटी रुपये आहे. तसेच कार्यक्षमतेच्या दृष्टीने देखील ही एक सुपर कार आहे.
सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर कारच्या डिलिव्हरीचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, त्यात लिहिले आहे की, "स्वतःला ही मजबूत आणि सुंदर भेट देत आहे." अभिनेत्रीने कार डिलिव्हर केल्याबद्दल मुंबई डीलरशिपचे आभार देखील मानले.
ही मर्सिडीज एसयूव्ही 2020 मध्ये भारतात लॉन्च झाली होती. SUV च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, Panamericana grill, beefy bonnet, boomerang-shaped LED DRLs सारखे नवीन डिझाईन घटक तिचे सौंदर्य वाढवतात.
AMG स्पोर्ट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, पॅनोरामिक सनरूफ, मर्सिडीज ME कनेक्टिव्हिटी, पॅडल-शिफ्टर्स आणि एअर सस्पेंशन यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. जेव्हा ती 120 किमी प्रतितास वेगाने बाहेर पडेल तेव्हा एअर सस्पेंशन SUV ची उंची 10 मिमीने कमी करेल. काही विशिष्ट फिचरमुळे ही कार रात्री आणखी देखणी दिसते.
SUV ला 3.0-लिटर 6 सिलेंडर ट्विन-टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळते, जे 429 Bhp पॉवर आणि 520 Nm पीक टॉर्क बनवते. हे अतिशय शक्तिशाली इंजिन आहे. त्यात माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानाचीही भर पडली आहे.
एसयूव्हीच्या परफॉर्मंसबद्दल बोलायचे झाले तर, यात 250 किमी प्रतितासचा टॉप स्पीड पाहता येईल. याशिवाय, एसयूव्ही केवळ 5.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितासाच्या वेगाने धावू शकते. SUV च्या समोरच ड्युअल स्क्रीन उपलब्ध आहे, जी यूजर इंटरफेसवर चालते. सेटिंग्ज आणि ड्रायव्हिंग मोड बदलण्यासाठी शॉर्टकट डायलसह नवीन AMG स्टीयरिंग व्हील देखील मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : पंजाबची 150 धावांपर्यत मजल; प्रभसिमरनला बाद करत व्यशकांतने दिला धक्का

SCROLL FOR NEXT