Raj Kapoor Death Anniversary esakal
फोटोग्राफी

'राज कपूरच्या सहवासात सूर्यही...',म्हणाले आदित्य राज कपूर

राज कपूरची आठवण करत आदित्य राज कपूरने सांगितले की,राज कपूरच्या सहवासात दिवस संपून सूर्य कधी मावळायचा याचे अजिबात भान नसायचे.

सकाळ ऑनलाईन टीम

प्रसिद्ध अभिनेता शम्मी कपूरचा मुलगा आदित्य राज कपूरच्या जीवनात राज कपूरला मानाचे स्थान आहे.आदित्य राज कपूरला आदर्श मानतो.आज प्रसिद्ध अभिनेता राज कपूर यांची पुण्यतिथी.त्यांची आठवण करत आदित्य राज कपूरने सांगितले की,राज कपूरच्या सहवासात दिवस संपून सूर्य कधी मावळायचा याचे अजिबात भान नसायचे.'काही तरी वेगळं करण्याची प्रेरणा आदित्यला राज कपूरकडून मिळाली', असे ते म्हणाले.

आदित्य लहान असताना एकदा त्याची आई गीताची प्रकृती गंभिर झाली होती.तेव्हा राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा यांनी आदित्य आणि त्याची बहीण कांचन यांची काळजी घेतली.
लहानपणी जेव्हा आदित्य आर.के स्टुडिओच्या आजुबाजुला खेळायचा तेव्हा त्याने अनेक गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यातून घडत गेला.सभोवतीच्या वातावरणातील फायदा,नुकसान आणि इतर गोष्टींतून कला कशी अवगत करायची याचे उत्तम उदाहरणं आदित्यला राज कपूरकडून मिळालीत.
राज कपूर एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही त्यांच्या आयुष्यात तितकेच प्रफुल्लित असायचे.त्यांच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर झळकायचा.
आदित्य लहानपणी राज कपूरला 'ताया काका' म्हणून हाक मारत.एका मुलाखतीत राज बद्दल सांगताना आदित्य म्हणतो,आम्हा मुलांवर ताया काका फार प्रेम करायचे.ते कुठल्याही कामात व्यस्त असले तरी सणासुदीला वेळात वेळ काढून आम्हाला भेटायचे.
आदित्यची आई आजारी पडल्यानंतर राज आणि त्यांची पत्नी यांनी शम्मीच्या मुलांचा सांभाळ केला.त्यातच काही दिवसातच आदित्यच्या आईचे निधन झाले.त्यावेळी शम्मी कपूर आणि त्याच्या मुलांना राज कपूरने आधार दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT