सिक्स पॅक अॅब्ज, गुड लूक्स आणि त्यावर क्रिस्प जॉ लाइन... अदनान सामीच्या या नव्या लूकमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. फोटोंमध्ये दिसणाऱ्या मस्क्युलर बॉडी आणि स्लीम कट फेसने चाहत्यांना वेड लावले आहे.
अदनान सामीचा चेहरा एवढा बदलला आहे की त्याला ओळखता येणेही कठीण आहे. एखाद्या हिरोइतकाच अदनान स्मार्ट दिसत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत अदनान यांची ओळख त्यांच्या लठ्ठपणावरून केली जायची. त्यावेळी त्यांचे वजन २२० किलो होते. २००५ साली अचानक अदनान संगीताच्या चकाकत्या विश्वातून बाहेर गेले. त्यांनी lymphedemaची शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतर त्यांनी ३ महिने पूर्ण विश्रांती घेतली. लठ्ठपणामुळे अदनान यांनी श्वासही घेता येत नसे. यावर वेळीच उपाय केला नाही तर ते ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाहीत, असे डॉक्टरांनी बजावले होते. अदनान यांनी १६ महिन्यांमध्ये १५० किलो वजन कमी केले. यादरम्यान त्यांना व्हाइट राइस, ब्रेड आणि जंक फूड खाण्यास मनाई करण्यात आली होती. सकाळी शुगर फ्री चहा, जेवणात व्हेजिटेबल सलाड आणि मासे, रात्रीच्या जेवणाला उकडीची डाळ, असा त्यांचा आहार होता. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.