जर तुम्ही 125cc सेगमेंटमध्ये नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुम्हाला दररोज ऑफिसला जाण्यासाठी 125 cc बाईक्स बेस्ट ऑप्शन आहेत. तसेच या बाईक्स तुमच्या बजेटमध्ये देखील सहज बसतील. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर..
बजाज पल्सर 125 (Bajaj Pulsar 125) बजाज पल्सर 125 बाईकमध्ये BS6 कंप्लायंट 124.45 cc, 4-स्ट्रोक, 2-वाल्व, ट्विन स्पार्क, DTS-i Ei इंजिन देण्यात आले आहे, जे 8500 rpm मॅक्झिमम 12 PS पावर आणि 6500 rpm वर 11 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. याच्या इंजिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.
या बाईकमध्ये 11.5 लिटरचा टँक दिला असून बाईकची एक्स-शोरूम किंमत 80,698 रुपयांपासून सुरु होते.
होंडा एसपी 125 (Honda SP 125 ) होंडा एसपी 125 मध्ये 125 सीसी इंजिन आहे, जे 7,500 आरपीएमवर 10.7 बीएचपीची मॅक्झिमम पॉवर आणि 6,000 आरपीएमवर 10.9 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या इंजिनसाठी 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत, या बाईकची किंमत ही 78,381 रुपयांपासून सुरु होते जी 82,677 रुपयांपर्यंत जाते.
टीव्हीएस रायडर 125 (TVS Raider 125) टीव्हीएस रायडर 125 मध्ये तुम्हाला 124.8 सीसी सिंगल सिलेंडर, एअर आणि ऑइल कूल्ड एसआय इंजिन देण्यात आले आहे, जे 7500 आरपीएमवर 11.22 बीएचपीची मॅक्झिमम पॉवर आणि 6000 आरपीएमवर 11.2 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या इंजिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकमध्ये 10 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली असून गाडीची एक्स-शोरूम किंमत 98,234 रुपयांपासून सुरु होते.हिरो ग्लॅमर एक्सटेक (Hero Glamour Xtec) हीरो ग्लॅमर एक्सटेक या बाईकमध्ये 125 सीसी सिंगल सिलिंडर बीएस 6 कंप्लायंट इंजिन देण्यात आले आहे, जे 7,500 आरपीएमवर 10.7 बीएचपीची मॅक्झिमम पावर आणि 6,000 आरपीएमवर 10.6 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये हिरोचे पेटंट i3s स्टँडर्ड फिटमेंट म्हणून देण्यात आले आहे. हिरो ग्लॅमर एक्सटेकची किंमत 80,500 रुपयांपासून सुरु होते जी 85,100 रुपयांपर्यंत जाते.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.