Mumbai Azad Maidan esakal
फोटोग्राफी

PHOTO : महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिक 'आझाद'वर एकवटले

मराठी भाषिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर (Mumbai Azad Maidan) एकवटत आपली ताकद दाखविली.

सकाळ डिजिटल टीम

सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्‍याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सीमाभागातील हजारो मराठी भाषिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर एकवटत आपली ताकद दाखविली.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे.
सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्‍याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सीमाभागातील हजारो मराठी भाषिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर (Mumbai Azad Maidan) एकवटत आपली ताकद दाखविली.
आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला आहे.
सीमाभागातील विविध गावातून आलेल्या हजारो मराठी भाषिकांनी (Marathi Bhasha) सकाळी नऊ वाजल्यापासूनच आझाद मैदानावर गर्दी केली.
बेळगाव (Belgaum), कारवार, निपाणी (Nipani), बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण आझाद मैदान व्यापून टाकला.
हातात भगवे ध्वज आणि कर्नाटकाच्या (Karnataka) अन्यायविरोधात हातात फलक घेऊन हजारो मराठी जनता संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.
मैदानावर उभारलेला मंडप अपुरा पडल्यामुळे अनेकजण मैदानातच रणरणत्या उन्हात थांबून होते.
आमच्या मागण्यांची दखल राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी करत सीमावासियांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT