बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार Akshay Kumar हा वर्षभरात जवळपास चार ते पाच चित्रपटांमध्ये काम करतो. यापैकी काही चित्रपट दणक्यात कमाई करतात तर काहींची सर्वसाधारण कमाई होते. रोमँटिक असो, कॉमेडी असो किंवा अॅक्शन.. प्रत्येक जॉनरच्या चित्रपटात काम करण्यास त्याची पसंती असते. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी अक्षयने खूप मेहनत केली आहे.
अक्षय कुमार हा गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. चित्रपट, जाहिराती यांमधून त्याने चांगली कमाई केली आहे. caknowledge वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार एकूण २००० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. विविध माध्यमांतून अक्षय दर महिन्याला जवळपास चार कोटी रुपयांची कमाई करतो. यापैकी सर्वाधिक कमाई ही ब्रँड एंडोर्समेंटमधून होते. एका एंडोर्समेंटसाठी अक्षय जवळपास सहा कोटी रुपये घेतो. मुंबईतील जुहू परिसरात अक्षयचं आलिशान घर आहे. या घरात तो पत्नी आणि मुलांसोबत राहतो. विदेशातही अक्षयची प्रॉपर्टी आहे. अक्षयला महागड्या गाड्यांचीही आवड आहे. त्याच्याकडे ११ लग्जरी गाड्या आहेत. यामध्ये मर्सिडीज बेंज, बेंटले, होंडा सीआरवी, पोर्श यांचा समावेश आहे. अक्षयकडे अनेक ब्रँड्सच्या बाईक्ससुद्धा आहेत. caknowledge ने दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारची वार्षिक कमाई- २०१९- ४४६ कोटी रुपये
२०१८- २७० कोटी रुपये
२०१६- २६९ कोटी रुपये
२०१५- २०७ कोटी रुपये
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.