amruta khanvilkar on airport : photo sakal
फोटोग्राफी

Photo : विमानतळावर 'चंद्रमुखी'चीच हवा.. पाहा खास फोटो..

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री अमृता खानविलकर थेट विमानतळावर पोहोचली आहे. यावेळी तिथे केलेल्या धमाल मस्तीचे हे खास फोटो..

नीलेश अडसूळ

Chandramukhi : प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि आदिनाथ कोठारे (adinath kothare) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. गुरुवारी या चित्रपटाचे प्रमोशन थेट मुंबई विमानतळावर जाऊन करण्यात आले आहे. यावेळी अमृताने चंद्रा गाण्यावर नाच करत चाहत्यांना घायाळ केले.

'चंद्रमुखी' चित्रपटाच्या विमानावरील या पोस्टरची सध्या भारीच हवा झाली आहे. हा मराठीतील पहिला प्रयोग असून विमानावर झळकण्याचा मान मिळवणारी अमृता ही पहिली अभिनेत्री आहे.
ढोलकीचा नाद, घुंगराचे बोल आणि चंद्राची अदा यामुळे विमानतळावरील वातावरण पूर्ण बदलून गेले होते. यावेळी विमानतळावर अमृतासोबत अभिनेता आदिनाथ कोठारे आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकही उपस्थित होते.
'चंद्रमुखी' या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अन्य प्रमुख कलाकारही आहेत.
यावेळी अमृताने विमानाजवळ जाऊन 'चंद्रा' ची साइन पोज दिली. तसेच चित्रपटातील 'चंद्रा' या गाण्यावर अमृता थिरकली. तिच्या हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: ट्रम्पच्या एका निर्णयाने भारतीय शेअर बाजार हाहाकार! सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला; नेमकं काय घडलं?

Pimpri Building Collapse: पुण्यात मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली; १४ पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

Pune: शेतकऱ्यांच्या आसवांचा बांध फुटला; कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Pandharpur Wari 2026: लाखो लोक पायी पंढरपूरला का जातात? वारी म्हणजे काय अन् वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? इथे वाचा

SCROLL FOR NEXT