फोटोग्राफी

HBD अनुराधा पौडवाल : लोकप्रिय गाण्यांमुळे लता मंगेशकरांबरोबर झाली होती तुलना

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा आज वाढदिवस,यावर्षी त्या 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1952 साली झाला. त्यांचे लग्न संगीतकार अरुण पौडवाल यांच्यासोबत झाले होते.

खरे नाव वेगळे- अनुराधा यांनी कपिल शर्माच्या कार्यक्रमात आपल्या नावाचा खुलासा केला होता. त्यांचे खरे नाव अलका नन्दकरणी होते. पण लग्नानंतर त्यांनी नाव बदलून अनुराधा ठेवले.
कालीचरणमुळे ओळख- 1973 साली आलेल्या अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी प्रमुथ भूमिका केलेल्या अभिमान या चित्रपटापासून अनुराधा यांनी आपल्या सांगितिक करिअरची सुरूवात केली. मात्र 1976 साली प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या कालीचरण चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
लता मंगेशकरसारखा आवाज- त्यांची तुलना लता मंगेशकर यांच्याशी केली जाऊ लागली होती. त्याकाळात लता मंगेशकर खूपच लोकप्रिय गायिका होत्या. गुलशन कुमार यांना अनुराधा यांचा आवाज लता मंगशेकर यांच्यासारखा वाटायचा. त्यामुळे त्यांनी आपण फक्त टी सिरिजसाठी गायचं असा निर्णय घेतला.
कुमार सानू- उदीत नारायण यांच्याबरोबर जमली जोडी- त्यांची चांगली जोडी जमली ती कुमार सानू आणि उदीत नारायण यांच्याबरोबर. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. याशिवाय सोनु निगम बरोबर त्यांनी अनेक गाणी गायली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी आणि जयदेव यासारख्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे
अनेक गाणी लोकप्रिय- पार्श्वगायिका म्हणून अनुराधा पौडवाल यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. 1990 साली आलेल्या आशिकी चित्रपटातील "नजर के सामने जिगर के पास" आणि दिल है के मानता नही या चित्रपटातील गाण्यांनी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
भक्तीगीतांकडे वाटचाल- अनुराधा पौडवाल यांना टी- सिरिजजे गुलशन कुमार यांनी  इंडस्ट्रीत आणले. 1997 साली गुलशन कुमार यांची हत्या झाल्यावर त्यांनी चित्रपटात पार्श्वगायन करणे थांबविले. त्यानंतर त्यांनी असंख्य भक्तीगीते गायली.
पती- मुलाचे निधन - 1991 साली पती अरूण पौडवाल यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला होता. आदित्य आणि कविता या त्यांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र गेल्यावर्षी मुलगा आदित्यचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर आघात झाला. त्यांची मुलगी कविता ही गायिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT