स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून या लग्नसोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित राहणार आहे.
केळवण, मेहेंदी आणि हळद थाटात पार पडल्यानंतर आता लग्नाचा शाही थाट अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नुकताच या मालिकेने १०० भागांचा टप्पाही पूर्ण केला आहे.
जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम. याच कुटुंबावरच्या प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.