IPL 2022 | Arjun Tendulkar Debut Sara Tendulkar SAKAL
फोटोग्राफी

अर्जून तेंडुलकर करणार पदार्पण? MI च्या ट्वीटवर साराने दिली खास रिअ‍ॅक्शन

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात अर्जुनला तेंडुलकर मिळणार संधी?

Kiran Mahanavar

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची (MI) 2022 या हंगामात अवस्था बिकट झाली आहे. MI संघाला अजूनही विजयाचे खातेही उघडता आले नाही. मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले असून सर्वांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मुंबई संघाचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला संधी मिळू शकते. मुंबई फ्रँचायझीने ट्विटद्वारे हे संकेत दिले आहेत.
मुंबई फ्रँचायझीने हॅशटॅगसह अर्जुनचे नाव लिहून ट्विट केले आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या मनात ही योजना सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरनेही कमेंट केली आहे.
मुंबई इंडियन्सच्या या ट्विटवर कमेंट करताना सारा तेंडुलकरने मनापासून प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजेच अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो हे पाहून सारालाही खूप आनंद झाला तोही आपल्या भावाला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.
अर्जुन तेंडुलकर 22 वर्षीय डाव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत देशांतर्गत स्पर्धेत मुंबईसाठी फक्त दोन टी-२० सामने खेळले असून त्यात त्याने 2 बळी घेतले आहेत. मेगा ऑक्शनमध्ये मुंबई फ्रँचायझीने अर्जुनला 30 लाख रुपयांना विकत घेतले आहे.
अर्जुनचे वडील आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे मेंटर म्हणून काम पाहत आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे तर मुख्य प्रशिक्षक श्रीलंकेचा महेला जयवर्धने आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT