फोटोग्राफी

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ५० लाख लोकांना फटका,PHOTO

धनश्री ओतारी

पावसाळ्यापूर्वीच आसाममध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांची स्थिती बिकट झाली आहे.

पुरामुळे राज्यात बुधवारी 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जिल्ह्यांमध्ये 55 लाख लोक बाधित झाले आहेत. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
राज्याच्या काही भागात पाऊस सुरूच असल्याने, ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांसह तिच्या उपनद्यांचा वेग वाढला आहे आणि राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्ये जलमय झाले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरले.
राज्यातील 32 जिल्ह्यांतील 4 हजार 941 गावांमधील 54.57 लाखांहून अधिक लोक अजूनही पुरात अडकले आहेत.
दिवसभरात एनडीआरएफ, एसडीआरएफ, आणि इतर एजन्सींनी राज्यभरात 276 बोटींच्या मदतीने एकूण 3,658 लोकांना बाहेर काढले.
आसाममधील 12 पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफने 14,500 हून अधिक लोकांना वाचवले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अहवालानुसार ५ हजारहून अधिक गावांमध्ये ४७,७२,१४० लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील विविध भागात २ लाखांहून अधिक लोक मदत छावण्यांमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT