'मन झालं बाजिंद' या मालिकेतील राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेने आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
अनेक अडचणींवर मात करून, प्रेमाची सत्वपरीक्षा दिल्यावर राया आणि कृष्णा एकत्र आले आहेत. पण त्यांच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी घुली मावशी नेहमी सज्ज असते. सध्या राया घरापासून दूर हळदीच्या शेतात राहतोय. राया घरात राहणार नाही म्हणून कृष्णादेखील आपल्या पतीची साथ देण्यासाठी त्याच्यासोबत हळदीच्या शेतात राहायला जाते. दोघांच्याही मनात एकमेकांसाठी अफाट प्रेम असल्यामुळे ते शेतातील छोट्या घरात देखील आनंदाने राहतात. भाऊसाहेबांना मात्र रायाचं असं घरापासून दूर शेतात राहण्याचा निर्णय पटत नाही आणि याच संधीचा फायदा घुली मावशी घेणार आहे. कृष्णाचा काटा काढण्यासाठी घुली मावशीने असंख्य प्रयत्न केले पण राया कृष्णासोबत असल्यामुळे ते नेहमी असफल ठरले. पण आता घुली मावशी राया आणि कृष्णा घरापासून लांब असल्यामुळे या दोघांवर देखील जीवघेणा हल्ला करणार आहे. यातून राया आणि कृष्णा सुखरूप वाचतील का, राया आणि कृष्णाचं प्रेम या अडचणीवरदेखील मात करेल का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.