पाहा नरक चतुर्दशीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील फुलांची मनमोहक आरास Sakal
फोटोग्राफी

पाहा नरक चतुर्दशीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील मनमोहक आरास

पाहा नरक चतुर्दशीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील फुलांची मनमोहक आरास

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : नरक चतुर्दशी व लक्ष्मी कुबेर पूजनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात फुलांची मनमोहक आरास करण्यात आली आहे.

विविध प्रकारच्या सुमारे दोन हजार किलो फुलांच्या सहाय्याने सजावट केली असल्याने जिकडे पाहावे तिकडे रंगीबेरंगी फुले दिसत असून, या मनमोहक सजावटीमुळे सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
बीड येथील विठ्ठलभक्त करण हनुमान पिंगळे यांनी झेडू, गुलछडी, गुलाब विविध रंगांतील ऍथेरियम, शेवंती, ऑर्केड, कामिनी आदी सुमारे दोन हजार किलो फुले आरासासाठी उपलब्ध करून दिली आहेत.
सजावटीसाठी तुळस आणि अननस देखील वापरण्यात आले आहेत.
विविध सण आणि राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांनी आणि त्या त्या काळात उपलब्ध असणाऱ्या फळांनी सजावट केली जाते.
रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे सावळ्या विठुरायाचे रूप आज अधिकच खुलून दिसत आहे.
कोरोनाच्या सावटामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी अनेक दिवस बंद होते. 17 एप्रिल 2020 पासून पंढरपूर यात्रा भरू शकल्या नव्हत्या. परंतु आता भाविकांना मंदिरात जाऊन श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचे मुखदर्शन घेता येत आहे. त्यामुळे भाविकांना फुलांची सजावट देखील पाहायला मिळत आहे.
साई डेकोरेटर्स शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी आरास डेकोरेशनचे काम केले आहे. कार्तिकी एकादशी 15 नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे कार्तिकी यात्रेपूर्वीच वारकरी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात येऊ लागले आहेत. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर परिसर बऱ्याच दिवसांनंतर गर्दीने फुलू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT