Andrew Symonds Death In Car Crash
Andrew Symonds Death In Car Crash sakal
फोटोग्राफी

20 व्या वर्षी 20 षटकार; मात्र व्यसनामुळे मातीमोल झाली क्रिकेट कारकिर्द

Kiran Mahanavar

अँड्र्यू सायमंड्सचा जन्म 9 जून 1975 रोजी बर्मिंगहॅम इंग्लंड येथे झाला. बालपणापासून तारुण्यापर्यंतची बरीच वर्षे त्याने इंग्लंडमध्ये गेली होते. इथूनच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अँड्र्यू सायमंड्सची गणना अशा क्रिकेटर्समध्ये होते ज्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. वयाच्या 20 व्या वर्षी इंग्लंडमध्ये ग्लुसेस्टरशायरकडून खेळताना त्याने ग्लॅमॉर्गनविरुद्धच्या सामन्यात 20 षटकार ठोकले होते.(Andrew Symonds Death In Car Crash)

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक अँड्र्यू सायमंड्सचा आज कार अपघातात मृत्यू झाला आहे.
सायमंड्सने 26 कसोटी, 198 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मधल्या फळीत खेळणाऱ्या सायमंड्सच्या बेधडक फलंदाजीने विरोधक थक्क होत असत.
सायमंड्सची जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणना होते.
सायमंड्सने आपल्या पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये दहशत निर्माण केली होती. सायमंड्सने ऑगस्ट 1995 मध्ये ग्लॉस्टरशायरसाठी ग्लॅमॉर्गनविरुद्ध 254 धावांची नाबाद खेळी खेळली होती. यादरम्यान त्याने 16 षटकार ठोकले जो एक विश्वविक्रम होता.
कौंटीमध्ये एका डावात 16 षटकार मारण्याचा सायमंड्सचा विक्रम 16 वर्षे कायम आहे. इंग्लंडच्या ग्रॅहम नेपियरने 2011 मध्ये या विक्रमाची बरोबरी केली होती.
सायमंड्सची क्रिकेट कारकीर्द दोन भागात विभागली जाऊ शकते. एक भाग 2008 पूर्वीचा आहे जो प्रेक्षणीय आहे, त्यानंतर कारकीर्द वादांनी घेरली होती.
2008 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान सायमंड्सने दावा केला होता की भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने त्याला माकड म्हटले होते. या प्रकरणावर सुनावणी होऊन भारतीय ऑफस्पिनरला क्लीन चिट देण्यात आली. या प्रकरणाला 'मंकीगेट' म्हणतात.
दारूच्या व्यसनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. जून 2009 मध्ये पब मध्ये भांडणे सायमंड्सला 'अल्कोहोल संबंधित घटनेमुळे' T20 वर्ल्ड कपमधून परत पाठवण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT