लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी कपल्स फार उत्सूक असतात कारण हाच काळ असतो जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चांगला वेळ घालवता. पण,काही कपल्स असे असतात की जे हनिमूनला जाताना कॉमन मिस्टेक करतात, ज्यामुळे तुमचे हनिमून खराब होऊ शकते. जाणून घ्या काय आहेत या चूका....
लग्नानंतर लगेच हनिमूनला जाणे : काही जण लग्न झाल्यानंतर लगेच हनिमूनला जातात. ही चूक कधीही करू नका. लग्नाच्या धावपळीनंतर आराम करण्यासाठी 2-3 दिवस वेळ द्या. मित्र-मैत्रिणीं आणि कुटुंबाल निरोप द्या आणि मग हनिमूनला जा.प्लॅनिंग न करताच हनिमूनला जाणे : जर तुम्ही प्लॅनिंग न करताच हनिमूनला जात असाल तर असे अजिबात करू नका. जिथे तुम्ही फिरायला जाताय तेथील माहिती असणे गरजेचे आहे. कधी, कुठे जाणार आहात, राहण्याची-खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित आहे ना याचे व्यवस्थि प्लॅनिंग करादुसऱ्या कपल्ससोबत तुलना करणे : काही कपल्स दुसऱ्या कपल्स एन्जॉय करताना पाहून तुलना करू लागतात. आजिबात असे वागू नका. प्रत्येकाला आपल्या पध्दतीने फिरायला आवडते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरकडे लक्ष द्या आणि हनिमून ट्रीप एन्जॉय करा. अॅक्टिव्हीटमध्ये जास्त बिझी राहणे : हनिमूनला गेल्यावर काही कपल्स खूप जास्त अॅक्टिव्हीटीमध्ये सहभाग होतात. त्याऐवजी अशा गोष्टी निवडा ज्यामध्ये तुम्ही आणि तुमचा पार्टनर सोबत असाल. तुम्हाला जास्त वेळ एकमेकांसोबत राहता येईल.गरज नसलेले सामान घेणे : ट्रॅव्हलिंग करताना होणाऱ्या कॉमन चूका हनिमूनला जाणारे कपल्स देखील करतात. तुम्ही हनिमूनला जाण्याआधी काही पॅकिंग टिप्स आणि ट्रीक्स फॉलो करू शकता.ऐनवेळी पॅकींग करणे : लग्नानंतर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही ज्या दिवशी हनिमूनला जाणार आहात त्याच दिवशी पॅकींग कराल. तुम्ही लग्नाच्या आधीच हनिमूनचे पॅकिंग करू शकता. कारण ऐनवेळी शेवटी पॅकिंग करायला घेतले तर हमखास तुम्ही काही ना काही सामान विसरू शकता.फोन आणि टिव्हीसाठी जास्त वेळ देणे : हनिमूनला गेल्यानंतर एकमेकांसोबत जास्त वेळ घालवणे गरजेचे असते. पण काही कपल्स खूप वेळ जास्तवेळ फोनवर आणि टिव्ही पाहण्यातच बिझी असतात. त्यामुळे ते आपल्या पार्टनरला जास्त वेळ देत नाही. हनिमून अविस्मरणीय बनविण्यासाठी आपल्या पार्टनरला जास्त वेळ द्या. तुम्ही हनिमूनला किती दिवस जात आहात हे महत्त्वाचे नाही पण तुम्ही हनिमून गेल्यावर तुमच्या पार्टनर सोबतचा वेळ चांगल्या कसा जाईल हे महत्त्वाचे आहे. कारण हनिमूनच्या आठवणी कायम तुमच्यासोबत राहतात.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.