Do you know before dating Vighnesh Nayantara was dating these... esakal
फोटोग्राफी

विघ्नेश शिवनला डेट करण्याआधी कोणाच्या प्रेमात वेडी होती नयनतारा ?

विघ्नेशला डेट करण्याआधी मात्र ही अभिनेत्री प्रभू देवाच्या प्रेमात वेडी होती.

सकाळ ऑनलाईन टीम

जिकडे तिकडे लग्नाची चर्चा चाललेल्या नयनताराचे आता चित्रपट निर्मात्याशी लग्न होणार आहे.सात वर्षांच्या डेटिंगनंतर नयनतारा आणि विघ्नेश लग्नबंधनात अडकणार आहेत.विघ्नेशला डेट करण्याआधी मात्र ही अभिनेत्री प्रभू देवाच्या प्रेमात वेडी होती.

विघ्नेश शिवनला डेट करण्याआधी नयनताराने अभिनेता सिम्बू आणि चित्रपट निर्माता प्रभू देवाला डेट केले आहे.ब्रेक असो वा डेटिंग नयनताराचे वयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे.
नयनताराने करियरच्या सुरूवातीच्या काळात सिम्बू या तमिळ स्टारला डेट करायला सुरूवात केली.पण मात्र तिचे हे नाते काही महिनेच टिकले.दोघांचे इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लिकही झाले होते.नयनताराने हे तिच्या प्रसिद्धीसाठी केले असल्याचा आरोप त्यावेळी तिच्यावर झाला होता.
सिम्बूनंतर प्रभू देवाच्या आयुष्यात प्रभू देवाने एन्ट्री घेतली.विल्लू चित्रपटाच्या शूटिंगपासून या दोघांनी डेटिंगला सुरूवात केली होती.जून २००९ मधे नयनतारा आणि प्रभू देवा लग्न करणार असल्याच्या बातम्याही पुढे आल्या होत्या.
नयनताराच्या हातावर प्रभू देवाच्या नावाचा टॅटूही तिने काढला होता.आश्चर्य म्हणजे नयनतारासोबत अफेयर असतानाच प्रभू देवाचे लग्न झाले.असे असूनही तो नयनतारासोबतचे नाते उघडपणे सांगत असे.
प्रभूच्या पत्नीने मात्र काही काळानंतर लग्न झाले असतानाही अफेयर ठेऊन कुटुंबाला आर्थिक पाठबळ न दिल्याचा आरोप केल्याने प्रभू देवाला कोर्टापर्यंत जावं लागलं.त्यानंतर प्रभू देवाने लताशी घटस्फोट घेतला.
काही काळाने आणखी एक खळबळजनक बातमी पुढे आली.'लग्नापर्यंत पोहोचण्या आधीच झाले ब्रेकअप' या बातमीनेही सर्वांना आश्चर्य झाले होते.मात्र तेव्हा प्रभू देवाने लग्नाचे कुठलेही कमिटमेंट दिले नसल्याचे सांगितले नव्हते.
मात्र उशिरा का होईना नयनताराला विघ्नेशच्या रूपात तिचे खरे प्रेम मिळाले.सात वर्षांच्या डेटिंगनंतर अखेर या दोघांचे लग्न होतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT