फोटोग्राफी

कॉमेडीयन ते आमदार: निवडणुकीत बाजी मारणाऱ्या 'आप'च्या भगवंत मान यांचा प्रवास

पंजाबच्या धुरी विधानसभेतून भगवंत मान ३८००० हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंजाबमध्ये आप पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भगवंत मान यांनी विधानसभेची जागाही जिंकली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसचे दलबीर सिंग गोल्डी यांचा पराभव केला आहे. त्यामुळे तिथे भगवंत मान हे मुख्यमंत्री होणार हा निर्णय जवळजवळ पक्का आहे. त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे.

जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये यावेळी आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सरकार स्थापन करू शकते, असे सागंण्यात आले होते. आप ने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले होते. ते सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
पंजाबच्या धुरी विधानसभेतून भगवंत मान ३८००० हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
भगवंत मान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७३ साली भारतातील पंजाबमधल्या संगरूर जिल्ह्यातील सतोज या गावात झाला. त्यांनी संगरूरच्या एसयुएस कॉलेजमध्ये बी.कॉम पदवी घेतली. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यावर काहीतरी हटके करायची इच्छा असल्याने त्यांनी नोकरी केली नाही.
भगवंत मान यांनी विनोदापासून राजकारणापर्यंत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मान यांनी इंद्रप्रीत कौरशी लग्न केले होते. पण दोघे २०१५ साली वेगळे झाले. त्यांना दोन मुले आहेत.
मनप्रीत सिंग बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीमधून त्यांनी राजकीय इनिंग सुरू केली. २०१२ मध्ये त्यांनी लेहरा विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना अपयश आले होते. यानंतर २०१४ मध्ये, भगवंत मान आम आदमी पार्टीमध्ये सामील झाले आणि आम आदमी पार्टीच्या तिकीटावर संगरूर लोकसभा मतदारसंघातून 2 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते.
आता या यशानंतर भगवंत मान यांचा मुख्यमंत्रीपदाचा रस्ता मोकळा झाला आहे. अरविंद केजरीवाल यांची स्ट्रॅटेजी यासाठी कारणीभूत ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT