bhagwant manns children reach punjab
प्रतिस्पर्ध्याला क्लीन स्वीप दिल्यानंतर आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शहीद-ए-आझम भगतसिंग यांचं मूळ गाव खटकर कलान येथे त्यांचा शपथविधी सोहळ्यास भगवंत मान यांच्या आई हरपाल कौर या देखील उपस्थितीत होत्या.भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येन गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या मुलांच्या उपस्थितीनं सातवर्षानंतर भगवंत मान यांची मुले त्यांना भेटली.भगवंत मान यांची मुलगी सीरत आणि मुलगा दिलशान यांनी अमेरिकेहून पंजाब गाठत वडीलांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. भगवंत मान आणि त्यांची पत्नी इंद्रपित 2015 मध्ये विभक्त झाले होते. दोन्ही मुली इंद्रपित यांच्याकडे असतात. सीरत कौर मन्ना (21) आणि दिलशान मन्ना (17) अमेरिकेहून पंजाबला आले आहेत. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.