२ ऑक्टोबर रोजी बिग बॉस १५ चा ग्रँड प्रीमियर रंगणार आहे. यंदाच्या सिझनसाठी बिग बॉसचं घर जंगल थीमनुसार डिझाइन करण्यात आलं आहे. पाहुयात या घराच्या आतील फोटो..
सलमान खान बिग बॉसचा 15 चा सूत्रसंचालक असेल. यावेळी स्पर्धकांना २४ तास जंगलात राहावं लागणार आहे. जंगल थीमनुसार घरातील प्रत्येक गोष्ट डिझाइन करण्यात आली आहे. निर्माते ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता यांनी हे खास घर डेकोरेट केलं आहे. हिरवीगार झाडे, सुंदर फांद्या, गवत, झाडांवरील झोपाळे, बगीचा असं सगळं या घरात पहायला मिळतंय. जंगलात 'गुप्त दरवाजा'देखील बनवण्यात आला आहे.जंगल थीमनुसार बाथरूम बनवण्यासाठी बांबूचा वापर केला गेला आहे.बिग बॉसचं घर प्रत्येक वर्षी अत्यंत कल्पकतेने डिझाईन करणे आव्हानात्मक आहे, असं ओमंग कुमार आणि त्यांच्या पत्नी म्हणाल्या. २ ऑक्टोबरपासून रोज कलर्स चॅनेलवर बिग बॉस १५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच हा शो वूट अॅपवर प्रेक्षक पाहू शकता.बिग बॉस १५ मध्ये शमिता शेट्टी, निशांत भट्ट, जय भानुशाली, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, डोनल बिष्ट, उमर रियाज, सिंबा नागपाल आणि साहिल श्रॉफ हे स्पर्धक सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.