येत्या १९ सप्टेंबरपासून 'बिग बॉस मराठी'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वात कोणते कलाकार बिग बॉसच्या घरात सहभागी होतील, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संभाव्य स्पर्धक कोणते आहेत, ते पाहुयात..नक्षत्रा मेढेकर- चंद्र आहे साक्षीला आणि लेक माझी लाडकी या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री नक्षत्रा बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
गायत्री दातार- तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता आहे. गायत्रीचं नाव निश्चित करण्यात आलं असून नियमांनुसार ती सध्या क्वारंटाइनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. संग्राम सामेळ- बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये अभिनेता संग्रामचीही जोरदार चर्चा आहे. नेहा जोशी- टेलिव्हिजन, वेब आणि चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेली अभिनेत्री नेहा जोशी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे. शाल्मली खोलगडे- मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही गायनासाठी प्रसिद्ध असलेली शाल्मली बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. चिन्मय उदगीरकर- घाडगे अँड सून फेम अभिनेता चिन्मयसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एण्ट्री घेणार असल्याचं कळतंय. घाडगे अँड सून मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमयेसुद्धा चिन्मयसोबत घरात एण्ट्री करणार असल्याचं समजतंय. आनंद इंगळे- अभिनेते आणि कॉमेडियन आनंद इंगळे यांच्या नावाचीही चर्चा आहे. नक्षत्रा मेढेकर- चंद्र आहे साक्षीला आणि लेक माझी लाडकी या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री नक्षत्रा बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पल्लवी सुभाष- मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या नावाचीही चर्चा आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.