मुंबई - आपल्या अभिनयापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करुन चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये शहनाज गिलचं Shehnaaz Gill नाव घ्यावं लागेल. आता या अभिनेत्रीचं एक फोटोशुट हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव झाला आहे. शहनाज गिल ही तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्हही आहे. बिग बॉसमध्येही ती सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं आपल्या परफॉर्मन्समुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. आता शहनाजचं एक फोटोशुट व्हायरल झाला आहे. त्या फोटोंना अल्पावधीत लाखोंच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत.
शहनाजनचं एक फोटोशुट सध्या कमालीचं व्हायरल झालं आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून शहनाज ही चर्चेत आहे. आपल्या हटक्या स्वभावामुळे शहनाज ही नेहमी चर्चेत असते. शहनाजच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्यांनी शहनाजचा हा लूक पाहिला आहे त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शहनाजनं त्यात हेअर कट केला आहे. तिचा तो अंदाज सर्वांना आवडला आहे. सध्या सोशल मीडियावर शहनाज गिलचं जे फोटोशुट व्हायरल झालं आहे त्यात ती एका प्रसिद्ध सेलिब्रेटीच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले आहे. प्रख्यात फोटोग्राफर डब्बू रतनानीनं हे फोटोशुट केलं आहे. शहनाजनं आपल्या इंस्टा वॉलवर हा फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिनं कमालीच्या पोज दिल्या आहेत. ज्याची सध्या चर्चा आहे. शहनाज ही डान्स दिवाने मध्ये सिद्धार्थ शुक्ला सोबत दिसली होती. यापूर्वी तिनं काही व्हिडिओमध्येही दिसली होती. बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती. त्यातून तिला एक वेगळी ओळख मिळाली होती. शहनाजच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास ती दिलजित दोसांजच्या हौसला रख नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं शुटींग हे कॅनडामध्ये झाले आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.