बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचे पहायला मिळते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचे पहायला मिळते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. काजोलच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांचीही पसंती मिळते.काजोल ही भारतीय अभिनेत्री आहे, जिनं आपल्या सुंदर अभिनयानं व नृत्यानं अनेक सिनेमा रसिकांची मन जिंकलीयत. काजोलने अनेक अॅवाॅर्डसुद्धा जिंकले आहेत. ज्यामध्ये 6 फिल्मफेयर, 12 फिल्मफेयर नामांकन यांचा समावेश आहे. यासोबतच तिनं 5 वेळा बेस्ट अॅक्टरेस फिल्मफेयर अॅवाॅर्ड सुद्धा जिंकला आहे. जो एक रेकॉर्ड मानला जातो. भारत सरकारनं तिला 2011 मध्ये चौथा सर्वोच्च सन्मान पद्मश्रीने सन्मानित केलं होतं.काही दिवसांपूर्वी काजोलनं बेज कलर साडीवरील हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.काजोलचं शिक्षण पांचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट बोर्डिंग स्कूल येथे झाले. खेळामध्ये फार आवड असलेली काजोल चांगली धावक होती. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ती नृत्य व अभिनय करायची. बारावीत असताना बेखुदी (१९९२) या चित्रपटात राहुल रवैल या नायकासोबत चित्रपट नायिका म्हणून काम सुरु केलं.अभिनयाचा शौक आता करिअर बनला पाहिजे, यासाठी तिनं बारावी पूर्ण करून फक्त अभिनय करायचा, असं ठरविलं. सोबतच अभिनयाचं धडेही घेतले. बाजीगर (१९९३) ही फिल्म सुपरहिट ठरली. यानंतर तिनं फिल्म इंदास्त्रीस अनेक सुपरहिट रोमांटिक चित्रपट दिले.दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५) ही फिल्म तिच्या करिअरची सर्वोत्कृष्ट फिल्म ठरली. शाहरुखसोबत तिची जोडी खूपच पसंतीस उतरली. त्यानंतर सलमानसोबत प्यार किया तो डरना क्या (१९९८), प्यार तो होना ही था (१९९८), कुछ कुछ होता है (१९९८) तसेच कभी ख़ुशी कभी गम (२००१) फिल्म तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाची साक्ष देतात.फिल्मी दुनियेसोबतच काजोल सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे. विधवा व अनाथ बालकांसाठी विविध संघटनांशी ती जोडली गेली आहे. महाराष्ट्र सरकारनं २००८ मध्ये काजोलला या योगदानासाठी कर्मवीर पुरस्कार देवून सन्मानित केलं आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.