bollywood celebs who turned athletes on screen file image
आजवर अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक नामवंत कलाकारांनी मोठ्या पडद्यावर दिग्गज खेळाडूंच्या भूमिका साकारल्या आहेत. खेळाडूंची भूमिका साकारणारे कलाकार कोणते आणि त्यांनी पडद्यावर कोणत्या भूमिका साकारल्या ते पाहुयात..
बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपट 'सायना'ला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटातील प्रमुख भूमिका परिणिती चोप्राने साकारली होती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सुलतान हा चित्रपट सुपर हिट ठरला. या चित्रपटामधील सलमानच्या फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधले. गावात राहणाऱ्या सुलतानचा सर्वसामान्य मुलगा ते कुस्तीपटू होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.2017 मध्ये प्रदर्शित झालेला 'चक दे इंडिया' हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटामध्ये शाहरूख खानने हॉकीपटू भूमिका साकारली. 1956 मध्ये आशियाई स्पर्धेत स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे धावपटू फ्लाइंग सिख म्हणजेच मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'मिल्खा सिंग'ला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तरने प्रमुख भूमिका साकारली.2008 मध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मेरी कौम यांच्या जीवनावर आधारित 'मेरी कौम' या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राने प्रमुख भूमिका साकारली. तिच्या या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तुफान या चित्रपटामध्ये फरहानने अज्जू भाई नावाच्या बॉक्सरची भूमिका साकारली आहे. बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी अनेक संकटांना सामोरं जाणाऱ्या अज्जूच्या जिवनावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे.माजी कुस्तीपटू महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित दंगल या चित्रपटामध्ये आमिर खानने महावीर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्या मुलींचा आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुल्तान या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने कुस्तीपटूची भूमिका साकारली आहे. तिच्या या चित्रपटाती अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. दिग्दर्शक आकर्ष खुरानाचा 'रश्मी रॉकेट' या आगामी चित्रपटामध्ये तापसी पन्नू खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.