आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयामुळे बॉलीवूडमध्ये प्रख्यात झालेला अभिनेता म्हणजे के के मेनन. त्याच्या अभिनयाचे जगभर चाहते आहेत. बॉलीवू़डमध्येही तो कमालीचा लोकप्रिय आहे. आज त्याचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयीच्या काही मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. हिंदी, इंग्रजी याबरोबरच वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यानं भूमिका केल्या. त्याच्या त्या भूमिकांना प्रेक्षकांना आवडल्या. कुणाचं अनुकरण न करता आपल्याला जे भावतं, आवडतं त्यावर काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणं. हा आपला हेतू असल्याचे के के सांगतो. चित्रपट, मालिका, वेबसीरिज, रियॅलिटी शो मध्येही त्यानं सहभाग घेतला आहे. काही सामाजिक उपक्रमांमध्येही तो दिसला आहे.
तमिळ, तेलुगू आणि गुजराती सिनेमामध्ये के के नं काम केलं आहे. त्यानं काही काळ थिएटरमध्येही काम केलं आहे. शुन्य या चित्रपटासाठी त्याला एशियन आणि अरबी सिनेमा फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं होतं. 2 ऑक्टोबर 1966 मध्ये केरळ राज्यात के के चा जन्म झाला. त्याचं बालपण हे पुण्यात आणि अंबरनाथ येथं गेलं. खडकीमधल्या रेंजहीलमध्ये त्याच्या बालपणीच्या आठवणी असल्याचं त्यानं सांगितलं होतं. मेननचे वडील हे कॅशियर मेनन म्हणून प्रसिद्ध होते. ते तरुण असतानाच त्यांचे आई व़डिल केरळातून मुंबईत आले होते. भविष्यात आपण मुंबईला शिफ्ट होऊ, त्यासाठी पुण्यापासून मुंबई जवळ आहे. अशी त्यांची धारणा होती. खडकीतल्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये के के मेननचं शिक्षण झालं. पुढील शिक्षण मुंबईत घेतलं. त्यानं एमबीएची डिग्री पुणे विद्यापीठातून घेतली आहे. 1988 मध्ये त्यानं मार्केटींगमध्ये स्पेशलायझेशन केलं होतं.
के केनं आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातीपासून केली. त्याला मार्लब्रो सिगारेटची जाहिरात करण्याची संधी मिळाली होती. त्यात तो पहिल्यांदा दिसला. त्यानंतर त्यानं कायनेटिक होंडाची देखील जाहिरात केली होती. बॉलीवूडमध्ये के के मेननची चुणूक तेव्हा दिसली जेव्हा त्यानं अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडेमध्ये काम केलं. त्यात त्यानं डीसीपीची भूमिका साकारली होती. के के मेननच्या गुलाल, शौर्य, लाईफ इन मेट्रो, कॉर्पोरेट मधील भूमिका प्रचंड गाजल्या. त्याची स्पेशल ऑप्स नावाची वेबसीरिजही प्रेक्षकांना कमालीची भावली होती. के के च्या वडिलांची नोकरी फिरतीची असल्यानं त्याला नागपूर, केरळ, मुंबई आणि पुणेमध्ये राहावे लागले आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.