Prime Minister Boris Johnson esakal
ब्रिटनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
अहमदाबाद : ब्रिटनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.आज (गुरुवार) सकाळी ते गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला.सुरूवातीला त्यांनी साबरमती आश्रमात पोहोचून महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर चरखा फिरवून सूतही कापलं.आता पंतप्रधान जॉन्सन गुजरातमधील वडोदरा येथील हलोलमध्ये जेसीबी प्लांटचं उद्घाटन करताना दिसले. या उद्घाटनानंतर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. तर ते सरळ जाऊन जेसीबीच्या ड्रायव्हर सीटवर बसले. त्यांनी ते सुरू करून बघितलं आणि परत दरवाजावर उभं राहत हात हलवले. त्यामुळं आता घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुजरातमधील गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिराला भेट दिली.साबरमती आश्रमाला जॉन्सन यांनी भेट देत महात्मा गांधींविषयी आपलं मत व्यक्त केलं.ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आज सकाळीच भारतात पोहोचले. अहमदाबाद विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांचं विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वागत केलं.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.