Maharashtra Budget Session 2023
Maharashtra Budget Session 2023 Sakal
फोटोग्राफी

Budget Session 2023 : नार्वेकर, गोरेंचा वॉकर अन् अहिरेंची नाराजी; अधिवेशनात पहिल्या दिवशी काय झालं?

सकाळ डिजिटल टीम
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली.
आजच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून दिवस सुरू केला.
नवे राज्यपाल रमेश बैस यांना यावेळी पोलीस पथकाने मानवंदना दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल बैस यांचं स्वागत केलं.
राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली.
अधिवेशनाची सुरूवात ‘वंदेमातरम्’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
पहिला दिवस गाजला तो म्हणजे मिलिंद नार्वेकरांनी सभागृहातली एन्ट्रीमुळे. आदित्य ठाकरेंबरोबर बोलता बोलता नार्वेकर सभागृहात आले आणि चर्चेचा विषय ठरले.
अपघातानंतर वॉकरच्या साहाय्याने विधानभवनात आलेले आमदार जयकुमार गोरे यांचीही या अधिवेशनामध्ये चर्चा होत आहे.
आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या पण गैरसोयीमुळे नाराज झालेल्या आमदार सरोज अहिरे याही चर्चेचा विषय ठरल्या. हिरकणी कक्षाची दुरावस्था दाखवून देत त्यांनी अधिवेशनातून निघून जाण्याचा इशारा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT