Shri Chhatrapati Shivaji Maharaj Sakal
फोटोग्राफी

Photo Gallery : पाकिस्तान सीमेवर छत्रपतींची मूर्तीस्थापना; पाहा फोटो

ही प्रतिकृती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापित करण्यात आली असून जगात प्रथमच महाराजांची प्रतिकृती इतक्या उंचावर बसविण्यात आली आहे.

दत्ता लवांडे

देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने चक्क मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित केली आहे. ही प्रतिकृती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापित करण्यात आली असून जगात प्रथमच महाराजांची प्रतिकृती इतक्या उंचावर बसविण्यात आली आहे.

मच्छल या गावात सैन्यदलाच्या वतीने महाराजांच्या दोन प्रतिकृत्या स्थापित करण्यात आल्या आहेत. या दोन्‍ही प्रतिकृती पुण्यातील २५ वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारल्या आहेत. मच्छल बटालियनचे कर्नल प्रणय पवार यांच्या कल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मूर्तीच्या माध्यमातून जम्मू काश्‍मीरमधील नागरिकांना देखील शिवाजी महाराजांची माहिती मिळत आहे.
मच्छल बटालियनच्या वतीने शिवरायांची एक मूर्ती नियंत्रण रेषेजवळ तर दुसरी मूर्ती मच्छल गावात तयार करण्यात आलेल्या ‘मराठा स्मृतिस्थळ’ येथे बसविण्यात आली आहे.
प्रत्येक मूर्ती साकारण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी विशिष्ट प्रकारच्या फायबरचा वापर करण्यात आले आहे. त्यामुळे ऊन, पाऊस किंवा बर्फवृष्टी झाल्यावरही मूर्तीवर काही परिणाम होत नाही असे मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी सांगितले.
हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ मराठा लाईट इन्फॅन्ट्रीच्या ५६ राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी या स्मृतीस्थळाची निर्मिती केली आहे. या समृतीस्थळात एक भिंत उभारण्यात आली आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या ३२ जवानांची नावे त्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. यामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचा इतिहास कायम सर्वसामान्यांपर्यंत पोहचत राहील, असेही कर्नल पवार यांनी सांगितले.
गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्‍मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे. शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या अनुषंगाने मच्छल येथे शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित करण्याची कल्पना सुचली.
मराठा समाजाला एकत्र करत स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी शत्रूला आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या मावळ्यांची फौजेप्रमाणे आज लष्कराचे सैन्य देखील सीमेवर शत्रूशी लढत आहे. शिवाजी महाराज हे प्रेरणेचे केंद्र आहेत असे कर्नल पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रिल्समध्ये प्रामाणिकपणाचा आव, कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी; ६ लाख घेताना तहसीलदाराला अटक; कोण आहे विजय चव्हाण?

T20 Squad: 501 धावा, 28 विकेट्स, 732 रन्स... तरीही या तीन मॅच विनर्सना टीम इंडियात जागा नाही; BCCI चा नेमका प्लॅन काय?"

Maharashtra Rain: मान्सून आला पण सक्रिय नाही; राज्यातील पावसाबाबत मोठं अपडेट, सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

IND vs AFG Test: भारताने केला डाव घोषित, अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! गिल, राहुल, पंत, सुदर्शनसह वॉशिंग्टनचीही 'सुंदर' खेळी

SCROLL FOR NEXT