चीनमधील जंगली हत्तींचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हत्तींनी जवळपास 500 किमी अंतर प्रवास करताना वाटेत मोठी नासधूस केली आहे.
हत्तींच्या या कळपाने अखेर एका कुनमिंग जवळच्या एका जंगलात त्यांनी विश्रांती घेतली. या हत्तींवर आता चीनच्या सरकारकडून नजर ठेवली जात आहे.हत्तींच्या कळपाने 1 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास सात कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चीनच्या सरकारी सीसीटीव्हीने सोमवारी हत्तींच्या कळपाची दृश्ये टीपली आहेत. हत्तींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत. हत्तींवर नजर ठेवण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास 400 हून अधिक जणांची टीम तयार केली आहे. तसंच दहापेक्षा जास्त ड्रोन हत्तींवर नजर ठेवत आहेत.स्थानिक प्रशासनाने हत्ती आकर्षित होतील अशा गोष्टी बाजारात किंवा बाहेर ठेवू नका असा आदेश नागरिकांना दिला आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.