चिपळूण बॅकवॉटर सफारी sakal
फोटोग्राफी

चिपळूण बॅकवॉटर सफारी

चिपळूण शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर हे अप्रतिम ठिकाण आहे. येथे आल्यानंतर केरळमधील एका गावात आल्यासारखाच भास होतो.

तेजस भागवत
गोवळकोटपासून ३ किलोमीटर्सच्या अंतरात ही सफर घडवण्यात येते. या मगरी सुमारे ८ ते १० फूट लांबीच्या आहेत. एका फेरीत जवळपास १० मगरी तरी पाहायला मिळतात. नशीब जोरावर असेल तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. पण त्यासाठी समुद्राला ओहोटी असली पाहिजे.
वाशिष्ठी खाडीकिनारी भरपूर मगरी बघायला मिळतात. त्यामुळे प्राणीप्रेमींबरोबरच इतरांचीही या मगरी पाहायला गर्दी होत असते.
वाशिष्ठी खाडीत विहार करण्यासाठी पर्यटक इथे येतातच, पण त्यांचे मुख्य आकर्षण असते, ते इथल्या मगरींचे.
ओहोटीच्या वेळी बोटीतून मगरी बघायला धमाल येते. वर कव्हर असलेली १५ सीटर स्पीडबोटीतून क्रोकाडाइल सफारी घडवली जाते. त्यातून खाडीत मनसोक्त भटकायचे, कांदळवनात लपलेल्या, कातळावर बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी पाहायच्या म्हणजे पर्वणीच ठरते.
वशिष्ठी खाडी त्यातले संथ पाणी, किनाऱ्याला टीपिकल वसलेले गाव, दुसऱ्या किनाऱ्याला डोंगरांची साथ, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, पक्ष्यांची ये-जा, असे अप्रतिम अनुभय घेता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT