makarsankrant esakal
फोटोग्राफी

संक्रांतीनिमित्त बाजारात गर्दी...

जिंतुरात कोरोना नियमांचे उल्लंघन ; मास्कचाही वापर दिसेना

सकाळ वृत्तसेवा

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. (छायाचित्र - योगेश गौतम)

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाणांच्या वस्तूंनी शहरातील बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी ग्राहकांची विशेषतः महिलांची गर्दी होत आहे.
मकरसंक्रांत हा पौष महिन्यात १४ जानेवारीला येणारा हा महिलांसाठी महत्वाचा समजला जातो तसेच शेती संबंधितही या सणाला महत्त्व आहे.
येथे आठवडी बाजार असल्याने मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान या सणासाठी गर्दी होत असताना नागरिक कोरोना नियमांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे. अनेक नागरिक मास्कचाही वापर करत नसल्याचे चित्र जिंतूरच्या बाजारपेठेत आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी नवनवीन दागिने, वस्त्रालंकार परिधान मातीच्या हळदी कुंकू लावून, दोऱ्याने सुतवून त्यामध्ये, गाजर, बोरं, हरभऱ्याची घाटे, ऊसाची पेरे, बिब्याची फुले दाळ, तांदूळ इत्यादी वस्तू भरून देवापुढे व तुळशी जवळ ठेवून सुवासिनींना वसा देतात, एकमेकींना तीळगूळ देऊन शुभेच्छा देतात.
आबालवृद्ध नागरिक देखील स्नेहभाव वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने एकमेकांना तीळगूळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याची प्रथा आहे.
अशा या पावन सणानिमित्त शहरात मध्यवर्ती चौक, पोलिस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मंडई, येलदरी रोड परिसरातील रस्त्यावर सुगडी, हळदीकुंकू, विविध रंगांची रांगोळी, बिब्याची फुले, ऊस, हरभऱ्याची डहाळी, वाळूक, काकडी, हलव्याचे काटेरी तीळ, वाण देण्यासाठी लागणाऱ्या नाना वस्तूंच्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

IND vs WI 1st T20I: वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? भारतीय प्रशिक्षकाने दिले महत्त्वाचे अडेट्स; म्हणाला...

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: महायुतीत बंडखोरीचे सत्र सुरूच; शेखर भोयर यांच्यानंतर भाजपच्या डॉ. संगीता शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT