नागपूर : पदार्थाला चव येण्यासाठी लसणाचा वापर आवर्जून केला जातो. परंतु, उग्रदर्पामुळे लसणाचे सेवन करताना नाकं मुरडली जातात. परंतु, आरोग्यदायी गुणधर्म लक्षात घेऊन लसणाच्या सेवनाला प्राधान्य द्यायला हवे. काही विकारांवरील घरगुती उपाय म्हणूनही लसणाचा वापर केला जातो. कोणत्या विकारावर लसूण गुणकारी ठरतो? हे जाणून घेऊ या...
अस्थमावर लसूण उपयुक्त ठरतो. लसणाच्या रसाचे दहा थेंब मधात मिसळा. हे मिश्रण ग्लासभर पाण्यात घालून प्या. यामुळे अस्थम्यावर नियंत्रण ठेवता येईल.कोमट पाण्यात लसणाच्या रसाचे थोडे थेंब घालून प्या. यामुळे बसलेला घसा मोकळा होईल.मुरूमांवरही लसणाचा रस लावता येईल. लसणाचा रस मुरूमांवर पाच मिनिटं लावून ठेवा. त्यापेक्षा जास्त नको. नंतर थंड पाण्याने धुवा. मुरूम जाईपर्यंत हा उपाय करा.केस गळण्याची आणि टक्कल पडण्याची समस्या असेल तर लसणाचा रस हा रामबाण उपाय ठरू शकतो. लसणाच्या रसामुळे रक्तप्रवाह मुळांपर्यंत पोहोचतो आणि केस बळकट होतात.केसांमध्ये उवा आणि लिखा झाल्यास लसणाच्या रसाचे पाच थेंब लिंबाच्या रसात मिसळा. केसांना लावा. रात्रभर ठेवा. यामुळे उवांचा बंदोबस्त होतो.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.