नागपूर : पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत चालले आहे. महागाईमुळे नागरिकांची कंबर मोडली जात आहे. साधा भाजीपाला विकत घ्यायला गेले तरी सहाशे ते नऊशे रुपये खर्च होऊन जाते. या कठीण काळात गरिबांनी जगायचे कसं, असा प्रश्न पडतो. शाकाहारी जेवण इतके महाग झाले असताना मांसाहारी जेवणाचा विचारच न केलेला बरा, अशी गरिबांची स्थिती झाली आहे. (Dearness-veg-non-veg-Vegetables-expensive-How-to-live-for-the-poor-nad86)
कोरोनाकाळात अंडीची मागणी चांगलीच वाढली. तेव्हापासून झालेली भाववाढ आजही पाहायला मिळत आहे. प्रति ट्रे चे भाव १७० ते १८० रुपयांपर्यंत पोहोचले असून, एका अंड्यासाठी सहा ते साडेसहा रुपये मोजावे लागत आहे.कोरोना आल्यापासून रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णांना चिकन आणि अंडी खाण्याचा सल्ला दिला. प्राण्यांनाही कोरोना होऊ शकतो या अफवेनंतरही चिकनची मागणी कमी झाली नाही. आज चिकन दोनशे ते सव्वादोनशे किलोने विकले जात आहे. एकवेळी विक्रेत्यांवर चिकन फेकून देण्याची वेळ आली होती.कोणताही विषाणू आला तरी त्याचा मटण विक्रीवर कोणताही प्रभाव पडत नाही. एकप्रकारे बकऱ्यांना रोग होतच नाही, असेच झाले आहे. त्यामुळेच मटणाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आच मटण ७४० ते ७८० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे.मासे, झिंगेचे भावही गगनाला भिडले आहे. मासांनाही चिकनचे भाव मिळत असल्याचे दिसत आहे. मासे दोनशे रुपये प्रति किलो तर झिंगे ८०० ते हजार रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे.कोरोनामुळे हॉटेल, धाबे बंद असले तरी होम डिलिव्हरी सुरू आहे. कसर काढण्यासाठी की काय हॉटेल व्यावसायिकांनी चांगलीच भाव वाढ केली आहे. मांसाहारी जेवणाचे पर प्लेटचे भाव तीनशे ते चारशेच्या घरात पोहोचले आहे.हॉटेलमधून मांसाहार पार्सल मागवायचा असल्यास खिसा चांगलाच रिकामा करावा लागत आहे. फूल प्लेटसाठी हजार ते तेराशे रुपये तर हाफ प्लेटसाठी पाचसे तर सहाशे रुपये मोजावे लागत आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.