गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली काहीशा नकारात्मक वातावरणात साजरा झालेला कार्तिक दीपोत्सव यंदा उत्साहात झाला. यानिमित्त सांगली, मिरज, हरिपूर, भिलवडीतील नदीकाठ सजले होते. नागरिकांनी रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची आरास करुन त्यावर दिवे पेटवत दीपोत्सव साजरा केला. सांगलीतील सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट, सांगलीवाडी घाटांवर लक्ष दिव्यांचे दृश्य मन मोहून टाकणारे होते. त्याची काही लोभस दृश्ये कॅमेराबध्द केली आहेत 'सकाळ'च्या उल्हास देवळेकर यांनी...
गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली काहीशा नकारात्मक वातावरणात साजरा झालेला कार्तिक दीपोत्सव यंदा उत्साहात झाला.आयर्विनपुल दिसत असलेले कृष्णानदीत दिवे सोडताना व तरुणी दिवे लावताना सरकारी घाट व माईघाटावरील गर्दी नागरिकांनी रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची आरास करुन त्यावर दिवे पेटवत दीपोत्सव साजरा केला. या विठुमाऊलीच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यानिमित्त सांगली, मिरज, हरिपूर, भिलवडीतील नदीकाठ सजले होते. भिलवडी घाटावरील दिव्यांची आरास अशा प्रकारे सजली होती. हे सौदर्य रात्रीच्या अंधारात आणि दिव्यांच्या प्रकाशाने खुलले होते.सांगलीतील सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट, सांगलीवाडी घाटांवर लक्ष लक्ष दिव्यांचे दृश्य मन मोहून टाकणारे होते.महिलांनी विविध आकाराच्या सुंदर आणि मनमोहक रांगोळ्या काढल्या होत्या. जिंजीच्या मारुती मंदीरातील ही सजावट..सावरकर प्रतिष्ठान शाळेत भारताचा नकाशाची प्रतिकृती दिव्यांनी सजवली होती.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.