संभाजी राजे यांनी वारकऱ्यांमध्ये जाऊन टाळ हाती घेतले व फुगडी देखील खेळली.
ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोष, टाळ-मुदंगाच्या गजर...अमाप उत्साह...अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी (ता.१) दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही पायी वारी रद्द झाली आहे. सरकारच्या आदेशानुसार मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंरपरेप्रमाणे सोहळा झाला.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सोहळ्यात दिंड्या सहभागी नाहीत. मात्र, प्रस्थान सोहळ्यानंतर देऊळवाड्यात प्रमुख दिंड्यांतील २५० भाविकांना दर्शनासाठी संस्थानने परवानगी दिली. देहू मंदिरात छत्रपती संभाजी राजे यांचे सपत्निक यांच्या हस्ते पादुकांचे पुजन करण्यात आले. देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या ३३६व्या पालखी सोहळ्याला वारकरी भक्तिमय वातावरणात सुरवात झाली. देहू मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली.वढू येथील वारकरी बहुमत शिवले यांना ही पुजेचे मान मिळाला. त्यानंतर संभाजी राजे छत्रपती वारकाऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले होते.देहू संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थानआषाढी एकादशी जसजशी जवळ येते तसतशी विठुरायाच्या भेटीची आस लाखो वैष्णवांना लागतेवारी म्हणजे वारकऱ्यांसाठी परमोच्च आनंदाचा क्षण. संतांच्या संगतीत पांडुरंगाच्या भेटीला पंढरीला जाण्यासाठी वारकरी वर्षभर आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहतात. श्री क्षेत्र देहूतून आषाढी वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत लाखो वारकरी दाखल होत असतात.३३६ वर्षांपासून पायी वारीची परंपरा आजही अखंडित सुरू असून, मानकरी, सेवेकरी व ३३० दिंड्यांसह पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होतो.संभाजी राजे यांनी वारकऱ्यांमध्ये जाऊन टाळ हाती घेतले व फुगडी देखील खेळली.संभाजी राजे यांनी वारकऱ्यांमध्ये जाऊन टाळ हाती घेतले व फुगडी देखील खेळली.तुकोबांच्या पालखी सोहळ्यात संभाजीराजे भक्तीरसात तल्लीनतुकोबांच्या पालखी सोहळ्यात संभाजीराजे भक्तीरसात तल्लीनसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.