मधुमेह असलेल्यांनी ६ पांढरे पदार्थ खाऊ नयेत. esakal
फोटोग्राफी

Diabetes असलेल्यांनी 'या' 6 पांढऱ्या पदार्थापासून राहा दूर

काही पदार्थांमुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक पदार्थांतून आपल्याला पोषक तत्व मिळत असतात. पण मधुमेह असलेल्यांना त्यांच्या डाएटची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण काही पदार्थांमुळे (Food) त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. परिणामी असे पदार्थ खाल्ल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते. प्रत्येकालाच शरीराच्या (Health)चांगल्या कार्यासाठी प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कार्बोहायड्रेट आवश्यक असतात. अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्सचे तीन मुख्य प्रकार असतात. त्यात स्टार्च, साखर आणि फायबर याचा समावेश असतो. मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांसाठी स्टार्च आणि साखरचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. परिणामी रक्तातील साखर वाढते. रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमध्ये स्टार्च आणि साखरेसारखे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ असतात. त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.

पास्ता- पास्तात सॉस, क्रीम, चिज आणि भरपूर बटर असते. त्यामुळे तुम्हाला १००० कॅलरीज, ७५ ग्रॅम फॅट, आणि १०० ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळते.पास्तात मैदा असतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. तसेच वजन वाढण्याचा-लठ्ठपणाचा धोका असतो.
पांढरा ब्रेड- पांढरा ब्रेड हा मैद्यापासून तयार होतो. त्यात रिफाईंड स्टार्चही वापरले जाते. हे पदार्थ साखरेप्रमाणे करतात तसेच लवकर पचतात. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यामुळे असा ब्रेड खाताना तुमच्या शरीरात फायबर चे प्रमाण कमी होते.
बटाटा- बटाटा सर्वांना आवडतोत. १०० ग्रॅम बटाट्यात ९७ किलो कॅलरी, २२.६ ग्रॅम कार्बोहाय़ड्रेट, ०.१ ग्रॅम चरबी, १.६ ग्रॅम प्रोटीन आणि ०.४ ग्रॅम फायबर मिळते. बटाट्यात एकूण ९८ टक्के कॅलरी असते. त्याचे कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर होते. यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स खूप वाढतो. असा इंडेक्स वाढणे हे मधुमेहाच्या रूग्णांसाठी चांगले नसते.
साखर - साखरेपासून बनलेल्या गोड पदार्थांमध्ये साखर तर असतेच शिवाय खराब कार्बोहायड्रेडही असतात.यात पौष्टीक मूल्य अजिबातच नसल्याने असे पदार्थ रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात. साखरेमुळे वजन वाढणे, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
मैदा- यात ७३.९ टक्के स्टार्च असतो. तर व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबरचे प्रमाण खूप कमी असते. मैद्यापासून बनवले जाणारे कोणतेही पदार्थ मधुमेहाच्या रूग्णांसाठी त्रासदायक असतात. मैद्याचा अधिक वापर हा बद्धकोष्ठतेशी संबंधित आहे. मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाणे मधुमेह आणि लठ्ठपणा असलेल्या रुग्णांसाठी योग्य नाही.
भात- ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या एका अभ्यासात भात खाल्ल्याने टाईप २ मधुमेह होण्याचा धोका खूप वाढतो हे दिसून आले आहे. जर तुम्हाला प्री-डायबिटीज असेल तर तुम्ही भात खायचा का यावर गंभीरपणे विचार करावा. पांढऱ्या तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT