dinosaur-fossil-park-in-gujrat esakal
गुजरातमध्येही असे एक पार्क आहे, ज्या पार्कला ज्युरासिक पार्क असे म्हणतात. गुजरातचे डायनासोर जीवाश्म पार्क पाहून तुम्हाला खात्री होईल की कधीतरी पृथ्वीवर हे अवाढव्य डायनासोर होते. एवढेच नाही तर या पार्कमध्ये फिरताना तुम्हाला ज्युरासिक पार्कमध्ये गेल्याचा अनुभव येईल. चला तर मग जाणून घेऊयात या अनोख्या पार्क विषयी.
बालासिनोर डायनासोर फॉसिल पार्क किंवा संग्रहालय गुजरातच्या बालासिनोर शहरातील रायोली या गावात आहे. बालासिनोर डायनासोर जीवाश्म पार्क हे जगातील तिसरे आणि भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय आहेबालासिनोर शहर पूर्वी वॅलासिनोर म्हणून ओळखले जात असे. असे म्हटले जाते की येथे डायनासोरची हजारो अंडी सापडली आणि त्यानंतर हे संग्रहालय बांधले गेले. असे म्हटले जाते की डायनासोरची अंडी आणि जीवाश्म 1980-81 च्या सुमारास रायोलीमध्ये सापडली, ही अंडी लाखो वर्षांपुर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या डायनासोरची आहेत हे संशोधनानंतर पुढे आले. हे पार्क 522 हेक्टरवर पसरलेले आहे. तसेच हे उद्यान आता संग्रहालयात रूपांतरित केले गेले आहे. ज्या ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकतो.या उद्यानात आपल्याला डायनासोरच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीची संपूर्ण माहिती मिळेल. येथे आपणास डायनासोर जीवाश्मांचे बारकाईने पाहता येतील आणि त्यांच्याबद्दल अधीक माहिती तुम्हाला या ठिकाणी देखील मिळेल.या उद्यानात विविध प्रजातींचे डायनासोर तुम्ही पाहू शकता. तसेच सखोल माहिती घेण्यासाठी गाईडदेखील सोबत घेऊ शकता.या उद्यानाला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम गुजरातच्या अहमदाबाद शहरात जावे लागेल. अहमदाबादहून या उद्यानात जाण्यासाठी आपण स्थानिक बस किंवा खासगी वाहनाने जाऊ शकता.उद्यानास भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा मानला जातो. पण आता कोवीड पार्श्वभूमीवर हे पार्क सध्या बंद आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.