आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली.
कऱ्हाड : नाद नाय करायचा सह्याद्रीच्या वाघाचा.. बघतोयस काय.. बाजी मारलीय वाघानं.. अशा घोषणांसह प्रचंड गुलालाची उधळण करत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. कोरेगाव : जिल्हा बँकेच्या कोरेगाव सोसायटी मतदारसंघातील निकालानंतर सुनील खत्री, आमदार महेश शिंदे व त्यांच्या समर्थकांनी शहरात विजयी रॅली काढली.विजयी रॅली काढताना कार्यकर्ते.आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली.कोरेगाव सोसायटी मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर, चिठ्ठीद्वारे सुनील खत्री यांची निवड घोषित करण्यात आली. त्यानंतर खत्री व आमदार महेश शिंदे यांना त्यांच्या समर्थकांनी उचलून घेत गुलालाची उधळण केली.आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत आनंद साजरा केला.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी मंगळवार पेठेतील त्यांच्या जुन्या निवासस्थांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी सहकारमंत्री पाटीलही गुलालात चिंब झाले होते.विजयानंतर शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला.बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) अखेर विजयाचा गुलाल अंगावर पडताच जावळी सोसायटी मतदारसंघाचे विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी सर्वप्रथम थेट सुरुची गाठले. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.