Vasubaras 2022  esakal
फोटोग्राफी

Vasubaras 2022 : म्हणून केली जाते वसुबारसची पूजा, जाणून घ्या पौराणिक कथा

देव-दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

- दा. कृ. सोमण

देव-दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या व्रतासंबंधी  एक   कथा सांगण्यात आली आहे. अर्थात पुराणातल्या या कथांचा शब्दश: अर्थ घ्यावयाचा नसतो तर प्रतिकात्मक अर्थ लक्षात  घ्यायचा असतो.

   एक वृद्ध बाई होती. तिची एक सून होती. त्यांच्या गोठ्यात गुरेही होती. गव्हाळी मुगाळी वासरेही होती. एक दिवस ती वृद्ध सासू शेतावर गेली. तिने जाताना सूनेला सांगितले की “ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. “ खरं म्हणजे तिला सांगायचे होते की गहू आणि मूग शिजवून ठेव. पण सुनेने अर्थ वेगळाच घेतला. तिने गव्हाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. वृद्ध सासू घरी आल्यावर तिला सारा प्रकार समजला. सासू आणि सून दोघीही घाबरून गेल्या. सासू देवापुढे धरणे धरून बसली.
देवाला विनवू लागली.-“ अरे देवा, तू कोपू नकोस. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर. “ देवांने वृद्ध बाईचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून चारा खाऊन परत येईपर्यंत वासरे जिवंत केली. मग त्या वृद्ध सासूने गाय वासराची पूजा केली. त्यांना गोडाचा नैवेद्य खायला घालून मगच ती जेवली.
या कथेचे तात्पर्य काय ? या कथेपासून कोणता बोध घ्यायचा ? तर मोठ्या वडीलधार्या माणसांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट नीट ऐकून घ्यायची. समजले नाही तर नम्रपणे पुन्हा विचारून नीट समजून घ्यायचे आणि त्याप्रमाणेच करायचे. सध्या गाई-गुरे , वासरे आजारी पडली तर जनावरांसाठीही दवाखाने आहेत. आजारी गुरांना लगेच दवाखान्यात नेऊन औषध द्यावयास हवे. तसेच त्यांची योग्य निगा राखली पाहिजे.
या कथेद्वारे आणखीही एक गोष्ट लक्षांत येते. त्या वृद्ध सासूने झालेल्या चुकीबद्दल सुनेला शिक्षा केली नाही . ती चूक अजाणतेपणाने झाली होती. तिच्या हातून अजाणतेपणाने  घडलेल्या अपराधासाठी क्षमा करण्याची विनंती तिने देवाला केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vastu Tips: पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? वास्तुशास्त्राचे 'हे' उपाय दूर करू शकतात पैशांची अडचण!

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

SCROLL FOR NEXT